पिंपरी-चिंचवड

भूखंडावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर

CD

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण झाल्यानंतर त्‍यांच्‍या काही जागा देखील ‘पीएमआरडीए’कडे समाविष्ट झाल्‍या आहेत. चार पेठांतील जागांचा यामध्ये समावेश होतो. या जागांवर झालेल्‍या अतिक्रमणांचा आता ‘पीएमआरडीए’कडून सर्व्हे केला जाणार आहे. या मोकळ्या जागांवरील अतिक्रमण, तात्पुरते शेड, दुकाने, पत्र्याची गोदामे काढण्याची तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची १९७२ मध्ये स्थापना करण्यात आली. नवनगर उभारणीसाठी जमीन संपादित करणे. जमिनीचा योग्य व नियोजनबद्ध विकास करणे. विकसित झालेले भूखंड निवासी, शैक्षणिक, औद्योगिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे हा उद्देश या प्राधिकरणाचा होता. सुमारे दहा गावांचे मिळून प्राधिकरणाची स्थापना झाली होती. त्यानुसार पेठ आठ, नऊ, अकरा आणि बारा येथील जमिनीचे संपादन करण्यात आले. मात्र, काही अपवाद जागा वगळता उर्वरित जागांवर नियोजनबद्ध विकास झाला नाही. काही जागांवर सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, अशी घरे उभारण्यात आली. तर, काही जागांवर प्रकल्प उभारले. २०२१ मध्ये जुने ‘पीसीएनटीडीए’चा ‘पीएमआरडीए’मध्ये विलीनीकरणाचा निर्णय राज्‍य शासनाकडून घेण्यात आला. त्‍यानुसार ‘पीसीएनटीडीए’च्‍या जागाही ‘पीएमआरडीए’कडे वर्ग करण्यात आल्या. विकास झालेल्‍या भूखंडाचा काही भाग हा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे देण्यात आला.
विकास झालेला नाही, त्‍या जागांबाबत ‘पीएमआरडीए’ प्रशासन सतर्क झाले आहे. त्‍यांच्‍या हद्दीत किती मोकळे भूखंड आहेत ? त्‍या जागांवर गेल्या काही वर्षात किती अतिक्रमणे झाली? या बाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. या जागा भविष्यात बळकावल्‍या जाऊ नयेत, यासाठी अगोदरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. तर अतिक्रमणे हटविण्याची देखील कार्यवाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT