पिंपरी-चिंचवड

वधू-वर परिचय मेळावा सुतार समाजातर्फे उत्साहात

CD

पिंपरी , ता. ४ : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, श्री विश्वकर्मा सुतार समाज मेडिकल असोसिएशन, विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय महामेळावा उत्साहात झाला. सामाजिक कार्यकर्ते पी. जी. सुतार अध्यक्षस्थानी होते. प्रतिभाताई भालेराव व प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी उद्‍घाटन केले. यावेळी महामेळाव्याच्या समन्वय समितीचे मुख्य प्रशासक विद्यानंद मानकर उपस्थित होते. यावेळी फक्त एका रुपयात वधू-वर नाव नोंदणी करण्यात आली. १९ रुपयांत संपूर्ण राज्यातील वधू-वर सूची (पुस्तिका) पालकांना उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय इच्छुक समाजबांधवांसाठी ५१ रुपयांत सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प करण्यात आला.
किशोर कदम व ग्रंथमित्र रमेश सुतार यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ भागवत यांनी आभार मानले. यावेळी सुतार समाजातील उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नारायण क्षीरसागर (नाशिक), दीपक शेलार (धुळे), विश्वकर्मा शार्दूल (नाशिक), राजेंद्र जाधव (नाशिक), भगवान राऊत, के. डी. शार्दूल (छत्रपती संभाजीनगर), मधू भागवत (पिंपरी चिंचवड), सुभाष सूर्यवंशी (लोणावळा), दिलीप अकोटकर (अमरावती), बंडूभाऊ माणूसमारे (नागपूर), नारायण शेलार (मुंबई), गणेश सुतार (निगडी), अजय क्षीरसागर (पुणे) यांचा समावेश आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

Brahmapuri Crime : मुलीला आजीकडे झोपवल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा लोखंडी सब्बलने वार करून निघृण खून; आरोपी ताब्यात

U19 World Cup: भारताची 'यंगिस्तान' सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! अंतिम सामन्यात इंग्लंडवर मिळवला 'वैभव'शाली विजय

Pune News : अधिक्षक अभियंता पदाची पदोन्नती रद्द करा; महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT