गुन्हे वृत्त
--
चिंचवडमधील व्यक्तीची
४० लाखांची फसवणूक
पिंपरी ः जादा नफा देण्याचे आमिष दाखवून चिंचवडमधील नोकरदार व्यक्तीची ४० लाख नऊ हजार १६४ रुपयांची तिघांनी फसवणूक केली. ११ नोव्हेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रत्नाकर कमलाकर कुलकर्णी (वय ४२, रा. चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९०८१०२२८७५ हा मोबाईल क्रमांक असलेली व्यक्ती, माला तोरडमल आणि सुरेश शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून ट्रेडिंग व स्टॉक मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. तीन वेगवेगळ्या बॅंक खात्यात पैसे भरायचे सांगितले. मात्र, कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली.
परताव्याचे आमिष; १८ लाखांची फसवणूक
पिंपरी ः वन वर्ल्ड टूर ॲंड ट्रॅव्हल्स व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा ६० ते ७० हजार रुपये परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाख ३५ हजार ७५९ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जयेश शिवराज चौधरी (वय ४०, रा. विजय प्लाजा, रेंटेड कॉटर्स, साई चौक, पिंपरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. २०१७ पासून चार फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पिंपरीतील जवाहर लाईटस् इलेक्ट्रॉनिक्स दुकानात हा प्रकार घडला आहे. चौधरी याने २५ लाख रुपये गुंतवणुकीस सांगितले होते. त्यातील सहा लाख ६२ हजार २४१ रुपये परत करून उर्वरित रक्कम परत केली नाही. शिवाय करार न करता फसवणूक केल्याचा आरो आहे.
हार्डवेअर खरेदी; व्यापाऱ्याची फसवणूक
पिंपरीः हार्डवेअर साहित्य घेऊन गेल्यानंतर त्याचे २३ लाख २८ हजार १९८ रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. कुमार रवी लालबहाद्दूर सिंग (वय ४३, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे त्याचे नाव आहे. राजेंद्र दशरथ भसे (वय ५४, रात. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे तळवडे येथे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांच्याकडून घेतलेल्या साहित्याची रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप सिंग याच्यावर आहे.
त्रिवेणीनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी ः जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी माहुल बाबासाहेब जावळे (वय ३०, रा. संजयनगर, ओटा स्कीम, निगडी) याला अटक केली आहे. तळवडेतील त्रिवेणीनगर चौकानजिक पत्राशेडमध्ये जुगार खेळताना ही कारवाई केली. हवालदार विनोद तानाजी व्होनमाने यांनी फिर्याद दिली आहे. विनापरवाना फन ॲंड जॉय अर्थात फन टार्गेट या ऑनलाइन खेळावर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळत असल्याचा आरोप जावळेवर आहे. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ११ हजार १२१ रुपये रोख जप्त केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.