पिंपरी-चिंचवड

अलार्ड विद्यापीठात यिन क्लबची स्थापना

CD

पिंपरी, ता. ६ : मारुंजी येथील अलार्ड विद्यापीठात ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) क्लबची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता आणि सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने घेण्यात आली.
यावेळी युगंधरा कंग्राळकर यांनी यिनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यिनचे प्रमुख शामसुंदर माडेवार यांनी यिन मंत्रिमंडळाची माहिती दिली. प्राइम मेंबर्सना किटचे वितरण करण्यात आले. अलार्ड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. आर. एस. यादव व अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव यांनी यिन क्लबला शुभेच्छा दिल्या. अर्पिता शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. यिन कोअर टीम सदस्य प्रणव भोसले, ऋतिक कांबळे व श्रेयश हांडे यांनी सहकार्य केले. डॉ. पद्मा झाडे व प्रा. सपना नांगरे यांनी समन्वय साधला. यिन अधिकारी चेतन लिम्हण यांनी नियोजन केले.

विद्यार्थ्यांना उद्योजकतेवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले. उद्योजकता म्हणजे समस्यांकडे संधी म्हणून पाहणे होय. यशस्वी उद्योजक आदर्श परिस्थितीची वाट न पाहता स्पष्टता व धैर्याने पुढे जातात, असा संदेश ठसविला. नावीन्यपूर्ण कल्पना या सभोवतालच्या बाजारपेठेतील गरजांचे निरीक्षण आवश्‍यक आहे. मजबूत व सकारात्मक मानसिकता हा कोणत्याही उद्योजकीय प्रवासाचा कणा आहे.
- स्वप्नील खारडे, संस्थापक , सीईओ एस. के. बॉट्स

सायबर सुरक्षा ही केवळ आयटी कंपन्या किंवा हॅकर्सपुरती मर्यादित नसून मोबाईल, इंटरनेट व ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या प्रत्येकासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षेमुळे आपले पैसे, ओळख व वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. भारत वेगाने डिजिटल होत असताना ऑनलाइन धोकेही वाढत आहेत.
- अनिल राज, संस्थापक, सायबर व्हॉल्ट सिक्युरिटीज

यिन क्लब हे विद्यार्थ्यांसाठी केवळ एक व्यासपीठ नाही, तर त्यांच्या नेतृत्वगुणांचा, उद्योजकतेचा आणि सामाजिक जाणीवेचा विकास करणारे प्रभावी माध्यम आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेटवर्किंगही तितकेच महत्त्वाचे आहे. यिन क्लब विद्यार्थ्यांना संधी, मार्गदर्शन आणि योग्य दिशा देऊन त्यांना सक्षम व जबाबदार नागरिक बनविण्यात मोलाची भूमिका बजावेल.
- डॉ. सोहन चितलांगे, कुलगुरू, अलार्ड विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." जुळून येति फेम अभिनेत्रीला कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी सगळ्यांसमोर बोलले.."

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT