किवळेत इलेक्ट्रिक बसची मागणी
मुकाई चौकातून पीएमपीएमएल बस मनपा भवन, भोसरी, निगडी, औंध इत्यादी भागासाठी वाहतूक करीत आहेत. दररोज बहुसंख्येने प्रवासी बसने प्रवास करतात. इथून सर्व साध्या बस सोडल्या जातात. परंतू इलेक्ट्रिक बस सोडल्या जात नाहीत. पीएमपीएमएल प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन किवळे भागातून इलेक्ट्रिक बस चालू कराव्यात.
- हिरामण येवले, विकासनगर, किवळे
PNE26V93795
कान्हे फाटा परिसरात पथदिव्यांची आवश्यकता
कान्हे फाटा परिसरात जवळच सारथी स्वदेश, लाईफ लॅन्ड आणि कोलिना सोसायटी आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून रस्त्यावर दिवे नाहीत, या सोसायटी मधून कान्हे स्टेशन वर जाण्यासाठी रस्ता देखील खुप खराब आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना कान्हे फाट्याला जाताना अडचणींचा सामना करावा लागतो. कान्हे ग्रामपंचायत आणि जांभुळ ग्रामपंचायतीने या सोसायटी परिसरात पथदिवे लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी या परिसरातून ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. अंधारात रस्त्यावरील भटके श्वान नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील रस्त्यांवर दिव्याची सोय करावी.
- प्रभाकर कोटकर, कान्हे फाटा
NE26V93797
स्पाईन रस्ता कचऱ्यामुळे अस्वच्छ
केशवनगर येथील स्पाईन रस्त्यावर कचरा साचला आहे. तसेच येथील नदीत जलपर्णी वनस्पतीची वाढ झाली असल्याने डासांचा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता नागरिकांसाठी सकाळी व सायंकाळी फिरण्याचे आवडीचे ठिकाण आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी करून येथे कचरा टाकणाऱ्या नागिरकांवर कारवाई करावी तसेच नदी आणि रस्ता परिसराची स्वच्छता करावी.
- रमेश देव, केशवनगर चिंचवड
PNE26V93798
चिखली येथील नेवाळे वस्ती टाळगाव परिसरातील महाराष्ट्र बॅंकेच्या पाठीमागील गार्डचे जागेत अधिकारी वर्गाला हाताशी धरून गणेश सिध्दी सोसायटीचे डी आणि ए विंग चे मधील राखीव जागेत बिल्डर पाटील यांनी अतिक्रमण केले आहे. आमदार व नगरसेवकाकडे तक्रार करूनही तेथे बांधकाम सुरू ठेवले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे
-सिताराम बल्लाळ, नेवाळे वस्ती चिखली
PNE26V93796
वल्लभनगर परिसरातील रस्ते अंधारात
वल्लभनगर परिसरात मागील आठवड्यापासून रस्त्यावरील दिवे काम करत नाहीत. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन परिसरातील दिव्यांची दुरूस्ती करावी.
- शेख बकतावर, वल्लभनगर, पिंपरी
PNE26V93799
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
शहरातील अनेक भागात स्वच्छता मोहिमेनंतरही नागरिकांकडून उघड्यावर सतत कचरा टाकला जात आहे. पिंपरीगाव भागात ही गंभीर समस्या आहे. या प्रकारांमुळे नागिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचरा टाकला जाणाऱ्या अशा जागांवर दंडात्मक कारवाई करून परिसर स्वच्छ करावा.
- शरद पाचणकर, पिंपरीगाव
PNE26V93800
सृष्टी चौकात वाहतूक कोंडी नित्याची
पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान जवळील सृष्टी चौक परिसरात सिग्नल यंत्रणा नसल्याने सतत वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि नियोजनाच्या अभावामुळे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वाहनांची गर्दी होते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. संबंधित प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन कायस्वरूपी उपाययोजना करावी.
-रामदुलारी जाधव, पिंपळे गुरव
PNE26V93802
गर्दीच्या ठिकाणी नियोजनाचा अभाव
चिंचवडगाव येथील गांधी पेठ, मंडई रस्त्यावर चतुर्थी, यात्रा काळात तसेच सणावाराला प्रचंड गर्दी असते. त्यातच लहान रस्ते असल्यामुळे नारिकांना येथून चालणे अवघड होते. अशा गर्दीत सुद्धा लोक दूचाकी, चारचाकी वाहने येथून दामटत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडते. या काळात हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करावा किंवा चारचाकी आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला पाहिजे. चिंचवड येथील धनेश्वर पुलाजवळील दशक्रिया घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांना ‘पार्किंग’ची सोय नसल्याने त्यांची वाहने पण रस्त्यावर लावलेली असतात. त्यामुळे पण अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांची गैरसोय होते.
- सुहास होनराव, चिंचवड
PNE26V93801
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.