पिंपरी-चिंचवड

ग्राम प्रबोधिनी विद्यालयात कौशल्य विकास मेळावा

CD

सोमाटणे, ता. ८ ः शालेय टप्प्यातच विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची ओळख व्हावी यासाठी ग्राम प्रबोधिनी विद्यालयातर्फे कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भविष्यात विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायात उतरावे, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांनी आत्मनिर्भर बनावे, यातून आपली प्रगती साधावी असे यामागील उद्देश आहेत.
संस्थेचे कार्यवाह व्यंकटराव भताने यांच्या संकल्पनेतून शाळेच्या प्रांगणात हा उपक्रम घेण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून विज्ञान आणि संगणक, हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय, इलेक्ट्रीक व मेकॅनिकल कौशल्य, डिजिटल साक्षरता आदी विषयांवर विविध मॉडेल्स प्रदर्शित केली. साळुंब्रे ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या मेळाव्यात शरद जाधव, राजेंद्र लासूरकर, विनायक देठे, विलास फड, गणेश भताने, पूजा जाधव आदींनी व्यवसायाच्या नव्या वाटा, शेतीपूरक व्यवसायांचा फायदा या विषयांवर मार्गदर्शन केले.
---

साळुंब्रे ः ग्राम प्रबोधिनी विद्यालयातर्फे कौशल्य विकास मेळाव्यात सहभागी झालेले विद्यार्थी.
-----------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बोर्डाच्या परीक्षेवेळी ‘या’ केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष; प्रांताधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकाऱ्यांची पथके; ‘या’ वेळेआधी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोचावे लागणार

GST Law Amendments : ‘जीएसटी’तील सुखावह बदल

आज मतमोजणी! सोलापूर झेडपीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत हाती येणार; अक्कलकोट, पंढरपूरच्या सर्वाधिक २४ फेऱ्या, कोणत्या तालुक्याच्या किती फेऱ्या, वाचा...

US tariffs : ‘ट्रम्पअस्त्रा’वरील उतारा

Newgen Software : न्यूजेन सॉफ्टवेअर

SCROLL FOR NEXT