पिंपरी-चिंचवड

सिंहगड एक्स्प्रेसला पासधारकांची गैरसोय

CD

पिंपरी, ता. ८ ः पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्यांप्रमाणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी एक स्वतंत्र किंवा राखीव डब्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. गर्दीच्या वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी किमान अर्धा डबा तरी राखीव असावा. तसेच, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, प्रगती व सिंहगड एक्स्प्रेसमधील मासिक पासधारक डब्यांमध्ये नियमित पास-तिकीट तपासणी करण्याची मागणीही प्रवासी करीत आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणारे कर्मचारी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवनवाहिन्याच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली पुणे-मुंबई रेल्वे सेवा, प्रवासी संघटनेच्या आग्रही मागणीनुसार व महत्प्रयत्नांती पुन्हा सुरु झाली. या गाड्या २२ मार्च २०२२ पासून नव्या स्वरूपात एल. एच.बी.सह सुरु केल्या.
वास्तविक, सिंहगड एक्सप्रेस मार्च २०२० पर्यंत १९ डब्यांची, तर २१ मार्च २०२२ पर्यंत १६ डब्यांची होती. सध्याची नवीन गाडी १४ डब्यांची असून २ जनरल डबे कमी करण्यात आले आहेत. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे १ जनरल व २ एस.एल.आर. असे एकूण ३ डबे कमी करण्यात आले आहेत. डेक्कन क्वीन व सिंहगड या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. एकच जनरल डबा असल्यामुळे, या डब्यात उभे राहणेही मुश्कील होते, असे अनेक प्रवाशांनी सांगितले.

पासधारकांशी वाद
जागा न मिळालेले तिकीटधारक सहाजिकच आरक्षित किंवा मासिक पासधारक डब्यांमध्ये घुसतात व मासिक पासधारकांशी वाद घालतात. अनेकदा वादाचे पर्यवसन भांडणात होते. असे नित्याचेच झाल्यामुळे मासिक पासधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे किमान तीन जनरल डबे जोडावेत, अशी विनंती संघटनेने केली आहे. पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र राखीव डबे आहेत, अपवाद फक्त सिंहगड एक्स्प्रेसचा.

सिंहगड एक्सप्रेस ही पहाटे पुण्याहून मुंबईला जाणारी पहिली गाडी असल्यामुळे वेळेवर कार्यालयात पोहचण्यासाठी, सहाजिकच या गाडीला प्रचंड गर्दी असते. असे असले तरी सिंहगड एक्स्प्रेसला मासिक पासधारक महिलांसाठी एकही स्वतंत्र राखीव डबा दिलेला नाही. हे अनाकलनीय आहे. या निवेदनाच्या प्रति मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे प्रबंधक, मुख्य वाणिज्य प्रबंधक, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांना देखील देण्यात आल्या आहेत.
- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटना
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

Gold Rate Today : आज सकाळीच सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT