पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

मोशीत सोन्याची बिस्किटे लंपास
पिंपरी : मौल्यवान पार्सल बदलून देऊन एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयची आणि कुरिअर कंपनीची ३ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी मोशी येथील एकदंत सोसायटीत घडली.
सचिन महारू भोसले (वय ३१, रा. तुकारामनगर, चऱ्होली खुर्द) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धीरजकुमार महाबीरलाल गुप्ता अकेला (वय ४९, रा. लहरीबहार, बिहार) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टाटा क्लिक फॅशनची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. आरोपीने बनावट नाव आणि मोबाईल नंबरचा वापर करत सोन्याच्या बिस्किटांचे मूळ पार्सल बदलले. त्याऐवजी बनावट पार्सल देऊन ८ ग्रॅम आणि १० ग्रॅमची सोन्याची दोन बिस्किटे लंपास केली.

पत्नीला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : पत्नीकडे सोन्याचे दागिने आणि पैशांची मागणी करत पतीने तिला दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी बोपखेल येथील कालिमाता मंदिराजवळ घडली.
या प्रकरणात अंजलीकौर कुणालसिंग भेंड (वय २५, रा. रामनगर, बोपखेल) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कुणालसिंग भेंड (वय २९), सासरे किस्मतसिंग भेंड (वय ५२), मोठा दिर गुरुप्रीतसिंग भेंड (वय २४) आणि छोटा दिर कबीरसिंग भेंड (वय २२, सर्व रा. बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंजलीकौर घरात असताना पती कुणालसिंग याने सोने आणि पैशांच्या कारणावरून वाद घातला. त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले आणि कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. अन्य आरोपींनी देखील त्यांना शिवीगाळ करत दगडाने व हाताने बेदम मारहाण केली.

थेरगाव येथे सव्वालाखाची घरफोडी
पिंपरी : बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान थेरगाव येथील कैलासनगर, गल्ली क्रमांक ३ मध्ये घडली. याबाबत देव विजय लोट (वय १९, रा. कैलासनगर, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल हरीश हरिजन उर्फ लोट (वय २६, रा. थेरगाव. मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देव हे शुक्रवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या घराला कुलूप लावून कामासाठी भोसरी येथे गेले होते. त्याचा गैरफायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप बनावट चावीच्या साहाय्याने उघडून आत प्रवेश केला. घरातून ७ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

कामाच्या अमिषाने ११ लाखांना गंडा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे झाडे लावण्याचे काम (निविदा) मिळवून देतो, असे सांगून एका तरुणाची ११ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २० एप्रिल २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ दरम्यान भोसरीतील लांडगे आळी येथे घडली.
संदेश नंदकुमार लांडगे (वय ३२, साई निवास, लांडगे आळी, भोसरी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित संतोष गायकवाड (रा. दिघी रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून निविदा मिळवण्यासाठी वेळोवेळी १७ लाख ४९ हजार रुपये घेतले. त्यापैकी फक्त ५ लाख ८८ हजार रुपये परत केले. निविदा मंजूर होऊन काम मिळाल्याचे खोटे सांगून आरोपीने बनावट पत्राची प्रत फिर्यादीला देत त्यांची फसवणूक केली.


पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी : पैशांच्या जुन्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात
धरून दोन व्यक्तींनी मिळून एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. ७) सकाळी कोयाळी येथील बिरोबा वस्ती येथे घडली.
या प्रकरणात अमोल दत्तात्रेय पांढरे (वय २८, रा. बिरोबा वस्ती, कोयाळी) यांनी दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भरत भाऊ बोरकर आणि प्रफुल्ल भरत बोरकर (दोघे रा. कोयाळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रफुल्ल याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारले, तर भरत याने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची पत्नी आणि भाऊ भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.

आकुर्डीत जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगजवळ उघड्या जागेत जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ७) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिस शिपाई प्रीतम फरांदे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धराम शरणाप्पा आचलेकर (वय ६०, रा. वाल्हेकरवाडी), राजू बापूराव वाघमारे (वय ४५, रा. आकुर्डी), परमेश्वर कलप्पा शिंगे (वय ४२, रा. रावेत), कासप्पा परप्पा खेलगिरी (वय ५०, रा. चिंचवड), मलप्पा भिमाप्पा आय्याळी (वय ३१, रा. चिंचवड) आणि गणेश उचप्पा दोरमनी (वय ५२, रा. रावेत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेत तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी या कारवाईत ३ हजार ९४० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup AFG vs SA : लाईव्ह सामन्यात काय घडलं? डॅनी मॉरिसन अन् महिला समालोचकाचा ‘तो’ 8 सेकंदांचा Video व्हायरल

नंदिनीच्या आवाजाला झालंय तरी काय? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मृणालचा आवाज डब केलाय? प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

Horscope : उद्या महासंयोग! 'या' 5 राशींसाठी 12 फेब्रुवारी ठरेल टर्निंग पॉइंट; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा एकाच दिवशी येणार

Narendra Modi: अमेरिकेसोबत मोदींचा आणखी एक करार? राफेलपेक्षा दुप्पट महाग विमानांची खरेदी

Ranji Trophy: मुंबईचं स्पर्धेतून बाहेर, तर जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; सेमीफायनलचे चार संघ निश्चित, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT