पिंपरी, ता. १३ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखविल्यानंतर मतदान करता येईल. एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीअंतर्गत गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानाची ओळख आहे. मतदान करण्यासाठी मतदाराने छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, त्यांना ओळख पटविण्यासाठी १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार आहे.
मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्र
- भारताचा पासपोर्ट
- आधार ओळखपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
- आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)
- केंद्र / राज्य / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे
- राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
- निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा किंवा अवलंबित व्यक्तींची छायाचित्र असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र आदी)
- लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा किंवा विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले ओळखपत्र
- स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
- केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करताना प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे. ज्यांच्याकडे सदर ओळखपत्र नसेल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.