पिंपरी-चिंचवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुफडा साफ

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. १७ ः महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचा सुफडा साफ झाला आहे. पक्षाला साधा भोपळा फोडता आला नाही. उमेदवार निवडून आले तर नाहीच. पण, दोन नंबरची मते मिळवण्यात देखील अपयश आले आहे. शहरातील कमकुवत पक्षबांधणी, खंबीर नेतृत्वाचा अभाव आणि पक्ष नेतृत्वाचे दुर्लक्ष हे पराभवाला कारणीभूत असल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या शहरातील नऊ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राहिलेल्या पाच नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी भाजपत तर; दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पक्षात मोठे खिंडार पडले. निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रभारी शहर प्रमुख संजोग वाघेरे यांनी देखील राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची मोठी वाताहात झाली.
शहर प्रमुखांची प्रभारी जबाबदारी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याकडे सोपविली होती. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि काँग्रेसची युती ऐनवेळी फिसकटल्यामुळे काँग्रेसने स्वतंत्र तर शिवसेना उबाठा, मनसे आणि रासप पक्षांनी युतीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या १२८ जागांपैकी शिवसेनेने ४८ ठिकाणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ ठिकाणी आणि रासपने २ ठिकाणी उमेदवार दिले. तीनही पक्षांना सर्व १२८ ठिकाणी उमेदवार देता आले नाहीत.
शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक इतर पक्षांत गेल्यामुळे उमेदवार देताना शहर नेतृत्‍वाची मोठी दमछाक झाली. उमेदवारांना एबी फॉर्मही उशिरा दिल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. निवडणुकीदरम्यान कुठेही पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठ्या जाहीर सभा झाल्या नाहीत. पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहीर आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या. तर; युवा सेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी वाकड येथे बैठक घेतली. या व्यतिरिक्त एकही स्टार प्रचारक शहरात फिरकले नाहीत. प्रचारादरम्यान नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे स्थानिक नेतृत्वाने आणि उमेदवारांनी दुर्लक्ष केले. महापालिकेत सत्ता असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही अपेक्षित टीका-टिप्पणी होताना दिसून आली नाही.

कमकुवत पक्षबांधणी
पिंपरी चिंचवड नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर झालेल्या पहिल्या १९८६ च्या निवडणुकीत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला. त्यानंतर झालेल्या १९९२ च्या निवडणुकीत तीन व १९९७ मध्ये नऊ आणि २००२ च्या महापालिका निवडणुकीत १२ नगरसेवक निवडून आले. याच कालावधीत हवेली विधानसभेवर सलग दोन टर्म शिवसेनेचे दिवंगत आमदार गजानन बाबर निवडून गेले. तसेच २००९ मध्ये ते नव्याने स्थापन झालेल्या मावळ मतदारसंघावर देखील सलग दोन टर्म एकत्रित शिवसेनेचे खासदार राहिले. शहरात शिवसेनेचे आमदार आणि खासदार निवडून आले. खासदार आणि आमदारांनी वैयक्तिक स्वार्थ साधला. मात्र पक्ष संघटन मजबूत करण्याचे कोणीच प्रयत्न केले नाहीत. शिवसेना पक्ष फुटीनंतर खासदार आणि चार नगरसेवकांनी शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणखी कमकुवत झाला. पक्ष फुटीनंतरही शहर प्रमुखांनी पक्ष संघटन मजबूत करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

पक्ष नेतृत्वाची सभा नाही
राज्यात २९ महापालिकांसाठी निवडणूक जाहीर झाली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत तळ ठोकून होते. मुंबई वगळता नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. पण, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकही सभा घेतली नाही किंवा रोड-शो केला नाही.

पक्षाची कामगिरी
महापालिकेच्या १२८ जागांपैकी शिवसेनेने ४८ ठिकाणी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेना (उठाबा) पक्षाला खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यातही अपयश आले. शिवसेनेच्या उमेदवारांना १८ ठिकाणी तिसऱ्या क्रमाकांची मते
मिळाली. प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चेतन पवार यांना ५,५१६ मते मिळाली. शहरातील पक्षाच्या उमेदवारांपैकी सर्वाधिक मते त्यांना मिळाली. इतर उमेदवारांना पाच हजारांचा आकडा गाठता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT