Pavana-Dam sakal
पिंपरी-चिंचवड

Pavana Dam : पवना धरणात २३.६२ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात २३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पवनानगर - पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात २३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने जरी ओढ दिली तरी जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.

मावळसह पिंपरी-चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१ टीएमसी आहे. आज अखेर पवना धरणामध्ये २३.६२% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आज अखेर धरणामध्ये २५ % इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पवना धरणात २ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.

पवना धरणाची पाणी पातळी ६०२.२२ मीटर असून, धरणामध्ये एकूण साठा ८८.०६ मीटर एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ५६.९१ फूट इतका आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल. मात्र, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई जाणवू शकते, अशी माहिती पवना धरण पाटबंधारे विभागाने दिली आहे.

मागील पाच वर्षांची जून महिन्यातील टक्केवारी

  • जून २०२२ - २४.९८ टक्के

  • जून २०२१ - ३१.०९ टक्के

  • जून २०२० - ३४.३२ टक्के

  • जून २०१९ - १९.४५ टक्के

  • जून २०१८ - २५.५८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT