पिंपरी-चिंचवड

पवना धरणाचे मजबुतीकरण सुरू करावे

CD

पवनानगर, ता .२० ः शहरासह मावळ तालुक्याला पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणाचे मजबुतीकरण सुरू करावे, अशी मागणी ॲड. भरत ठाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील सहभागी ज्ञानेश्वर ठाकर यांनी लोकशाही दिनानिमित्त तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
धरणाच्या कॉंक्रीट भागातून गळती होत असल्याने दगड व मातीचा बंधारा मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच काँक्रिटीकरण बांध जीर्णावस्थेत असल्याने धोका निर्माण झाला आहे. मजबुतीकरण न झाल्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने साठवता येत नाही. वीस वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने मजबुतीकरणाचे कामे सुरू केली होती, मात्र धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे निराकरण न झाल्याने ती कामे रखडली गेली. निवेदनात कोथुर्णे पुलाचे बांधकाम व रस्ता लवकर पूर्ण करावे, दुधीवरे मार्गे लोणावळा-पवनानगर बस सेवा सुरू करावी, पवनमावळमधील इतर प्रलंबित प्रश्न सोडवावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, जुना कारमालकही ताब्यात; महत्त्वाची माहिती लागली हाती

Solapur Weather: 'साेलापुरात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात घट'; पारा १५.४ अंशांवर, थंडीचा जोर वाढू लागला

दिल्ली स्फोटात ९ जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जखमी; मृत अन् जखमींची यादी आली समोर

Latest Marathi Breaking News : पुण्यात थंडीची लाट, तापमानाचा पारा घसरला

Pandharpur Vitthal Temple: 'पंढरपूरतील विठ्ठलाच्या चरणी ५ कोटी १८ लाखांचे दान'; कार्तिकी वारीत यंदा एक कोटी ६१ लाख रुपयांनी वाढ..

SCROLL FOR NEXT