पिंपरी-चिंचवड

रावेत, आकुर्डीतील पदपथावरील कचरा साफ

CD

सकाळ इम्पॅक्ट


रावेत, ता. ८ : रावेत, आकुर्डी परिसर आणि मुकाई चौक ते औंध बीआरटीएस रस्त्याच्या पदपथावरील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा साफ करण्यात आला आहे. विशेषतः म्हस्के वस्ती, रावेत येथील ओपन जिम परिसरात दीर्घकाळ साचलेला कचरा, प्लास्टिक आणि ओला-कोरडा कचरा हटविण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून रावेत आणि आकुर्डी परिसरातील पदपथांवर साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना चालणे अवघड झाले होते. काही ठिकाणी दुर्गंधी आणि डासांची पैदास वाढल्याने परिसरातील रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. त्यावर ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून स्वच्छतेकडे लक्ष वेधले. त्याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ते आणि पदपथ स्वच्छ केले. सर्व नागरिकांनी कचरा पदपथांवर न टाकता महापालिकेच्या ट्रॉलीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

‘‘परिसर स्वच्छ झाल्याने आम्ही समाधानी आहोत. पण, ही स्वच्छता कायम राखणे गरजेचे आहे.’’
- प्रतीक पाटील, रहिवासी, रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport Inauguration : नवी मुंबई विमानतळ उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींकडून दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख, म्हणाले...

Mhada House: मास्टर लिस्टवरील 'त्या' ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार; म्हाडा एकतर्फी कारवाईच्या तयारीत, कारण...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय! वर्षभरातील ३१ लाख १८ हजार रुपये वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान

Railway Jobs 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेतील खेळाडूंना थेट जॉब, प्रक्रिया आणि पगार एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT