पिंपरी-चिंचवड

आधुनिकता, पर्यावरण अन् एकोप्याचा सुरेख संगम

CD

आमची सोसायटी - आमचा उपक्रम सुखवाणी कलरोनिक सोसायटी, रावेत

संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता. ८ ः रावेत परिसरात अनेक अत्याधुनिक निवासी संकुले उभी राहत आहेत. त्यापैकीच एक सुखवाणी कलरोनिक सोसायटी औंध-रावेत बीआरटी मार्गालगत वसलेली. आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विचारांचा सुंदर संगम इथे दिसतो. ही सोसायटी केवळ रहिवासी प्रकल्प नसून एक संस्कृती, जीवनमूल्ये आणि एक जबाबदार नागरी समुदायाचे उत्तम उदाहरण आहे.
सोसायटीची रचना आधुनिक शहरी गरजांना साजेशी आहे. वास्तुशास्त्र, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा अद्‍भुत समतोल येथे दिसून येतो. सोसायटीमध्ये विस्तृत रस्ते, सुशोभित बागा, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी आसन व्यवस्था अशा सर्व सुविधा आहेत. जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, बहुद्देशीय हॉल आणि वाचनालय यामुळे ही सोसायटी केवळ निवासासाठी नव्हे; तर आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी घडवल्याचे दिसून येते.

उच्चतंत्रज्ञानयुक्त सुरक्षा
सोसायटीत चोवीस तास सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही निगराणी प्रणाली आणि डिजीटल प्रवेश नियंत्रणासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक टॉवरमध्ये इंटरकॉम सुविधा असून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची नोंद व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे केली जाते. मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग ठरवले गेले आहेत. त्यामुळे रहिवासी निश्चिंतपणे आपला दिवस व्यतीत करू शकतात.

पर्यावरणपूरक जीवनशैली
सोसायटीचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा पर्यावरणाभिमुख दृष्टिकोन. येथे जलपुनर्भरण यंत्रणा बसवून पावसाचे पाणी साठवले जाते. भूजलस्तर वाढविण्यासाठी त्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे सोसायटीने दरवर्षी लाखो लिटर पाण्याची बचत साधली आहे. त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे. त्याद्वारे सार्वजनिक भागांतील प्रकाश व्यवस्था आणि पंप चालवले जातात. त्याने वीजबिलात लक्षणीय बचत होत आहे. ‘ग्रीन लिव्हिंग’चा आदर्श या सोसायटीने घालून दिला आहे.

शून्य कचऱ्याकडे पाऊल
सोसायटीने स्वच्छता हीच सेवा या तत्त्वाचा स्वीकार केला आहे. प्रत्येक घरात कचरा वर्गीकरण प्रणाली अंमलात आणली गेली आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित केला जातो. कंपोस्ट युनिटच्या माध्यमातून ओल्या कचऱ्याचे जैविक खत तयार केले जाते आणि तेच खत सोसायटीच्या बागांमध्ये वापरले जाते. त्यामुळे एक प्रकारे शून्य कचरा सोसायटी होण्याकडे सुखवाणी कलरोनिकने पाऊल टाकले आहे.

सामूहिक संस्कृती-सण
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, होळी, ईद, ख्रिसमस हे सण सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र साजरे करतात. सामाजिक सलोखा आणि सामूहिक संस्कृती हीच या सोसायटीची खरी ओळख आहे. बालदिन, महिला दिन, योगा दिन, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. मुलांसाठी चित्रकला, बुद्धिबळ, क्रिकेट आणि नृत्य स्पर्धा तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आणि स्नेहमेळावे घेतले जातात.

सामाजिक जबाबदारीचे भान
रहिवासी केवळ आपल्या सोसायटीपुरते मर्यादित नाहीत; तर परिसराच्या विकासातही सक्रिय सहभाग घेतात. ‘स्वच्छ रावेत, हरित रावेत’ या मोहिमेत त्यांनी भाग घेतला. परिसरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबवले आहेत. याशिवाय, प्लॅस्टिक बंदी, वृक्षारोपण आणि पर्यावरण शिक्षण उपक्रमांमधून स्थानिक शाळांनाही सहभागासाठी प्रोत्साहित केले जाते.

भविष्यातील उपक्रम
सोसायटीने भविष्यात आणखी काही नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. सोसायटीच्या सर्व सार्वजनिक भागांत उर्जा बचतीसाठी सेन्सर आधारित स्मार्ट लाइटिंग सिस्टिम बसविणे,
इमारतींच्या भिंतींवर उभ्या बागा तयार करून हिरवाई वाढवण्याचा ‘ग्रीन वॉल’ उपक्रम. सर्व वयोगटांतील लोकांसाठी वाचन संस्कृती वाढवण्याच्यादृष्टीने सार्वजनिक ग्रंथालय. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग युनिट्सची स्थापना करण्याचाही त्यात समावेश आहे.


सुखवाणी कलरोनिक ही फक्त निवासाची जागा नाही; तर एक मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे. आम्ही आधुनिकतेसोबत पर्यावरण आणि एकोपाही जपतो. भविष्यातही सुखवाणी कलरोनिक रावेत परिसरासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल. ‘स्मार्ट लिव्हिंग’, ‘ग्रीन लिव्हिंग’ आणि ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ या संकल्पनेचा मूर्त आदर्श घालून देऊ.
- संदीप काणे, अध्यक्ष, सुखवाणी कलरोनिक सोसायटी, रावेत

सुखवाणी कलरोनिक सोसायटी ही आधुनिक नागरी जीवनाचा आदर्श आहे. जिथे तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सामाजिक मूल्ये यांचा सुंदर संगम घडतो. ही सोसायटी केवळ रहिवाशांसाठी घर नाही; तर एक समुदाय आहे; जो एकोप्याने, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने जगतो.
- प्रदीप वकील, सचिव, सुखवाणी कलरोनिक सोसायटी, रावेत

ही केवळ इमारतींची मालिका नाही. ही संस्कारांची, सौहार्दाची व सामंजस्याची सोसायटी आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक रहिवाशाला सुरक्षित, आनंदी आणि उत्साही जीवन देणे आहे.
- बाल सेल्वमणीकंदन. व्ही. कोषाध्यक्ष, सुखवाणी कलरोनिक सोसायटी, रावेत


संध्याकाळी सर्व रहिवासी एकत्र येतात. गप्पा मारतात. चालतात. ही आपुलकी आजच्या यांत्रिक जगात दुर्मिळ आहे.
- मीना वकील, सदस्या, ज्येष्ठ नागरिक

RVT25A00094, RVT25A00095, RVT25A00096

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT