पिंपरी-चिंचवड

रावेत पालिका शाळेचे फुटबॉलमध्ये यश

CD

पिंपरी, ता. २२ : क्रीडा विकास संस्थेतर्फे (शक्ती गर्ल्स) पुण्यातील सेंट मेरी स्कूलच्या मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत रावेतमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९७ च्या विद्यार्थिनींनी लक्षवेधी कामगिरी केली. १५ वर्षांखालील गटात शाळेने प्रथम, १३ वर्षांखालील गटात तृतीय क्रमांक पटकावला.
संस्थेच्या समन्वयक महिमा बारसे आणि फुटबॉल प्रशिक्षक संदेश बोर्डे यांचे दोन्ही संघांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या माध्यमातून शाळेला फुटबॉलसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शाळेसाठी ३७ फुटबॉल किट्स देण्यात आल्या. त्यामुळे मुलींना दर्जेदार सराव करण्याची संधी मिळाली. क्रीडा शिक्षिका पूनम देवकाते यांनीही मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
यशस्वी संघांचा शाळेत विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सायरा शिकलगार यांच्या हस्ते संदेश बोर्डे, पूनम देवकाते आणि इतर विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर पवार, सुखदेव वीर, जयश्री जाधव, अर्चना ओहोळ आदी उपस्थित होते. शशिकांत चौधरी यांनी आभार मानले.
-----
फोटो 70090
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Election :व्यक्ती की पक्ष? मागील अपयशानंतर पंचवटी 5 मध्ये भाजपची हवा; इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता

तेव्हा स्थळं यायची आणि अजूनही येतात पण... लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान; 'माझं आयुष्य हे...'

Latest Marathi News Live Update : भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक

Nashik Fire Accident : दुःखाचा डोंगर! मुलीच्या लग्नासाठी जपलेली तीन लाखांची रक्कम आगीत खाक, आईचे स्वप्न भंगले

Tejas crash : दुबई एअर शो मध्ये क्रॅश तेजस विमानाच्या पायलटचा शेवटचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT