रावेत, ता. १ : रावेत आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुकाई चौक ते औंध बीआरटीएस मार्गाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त असलेल्या वाहनधारकांना आणि स्थानिक रहिवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
मुकाई चौक हा रावेत, किवळे, मामुर्डी आणि पुण्याला जोडणारा दुवा आहे. मुंबई-पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक आणि हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे कर्मचारी या मार्गाचा वापर करतात. मात्र, या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे आणि अर्धवट डांबरीकरणामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी होत होती. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने या कामाला गती दिली आहे.
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वारांचे घसरून पडण्याचे प्रमाण वाढले होते, तसेच धुळीमुळे श्वसनाचे विकार जडत असल्याच्या तक्रारीही रहिवाशांनी केल्या होत्या. मुकाई चौकातील रस्त्याचे काम पूर्ण होणे ही आमची जुनी मागणी होती. पावसाळ्यानंतर या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. आता डांबरीकरण सुरू झाल्याने या भागातील धुळीचा त्रास कमी होईल आणि प्रवासाचा त्रासही वाचेल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
- रस्ता दुरूस्तीने होणारे फायदे
वाहतूक वेगवान होईल
दर्जेदार रस्त्यामुळे प्रवासाची सुरक्षा वाढेल
नोकरदारांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.