पिंपरी-चिंचवड

नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिना होत आहे. तरीही मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेले नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यांवरच शाळेत यावे लागत आहे.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व नगरपालिका मिळून २९२ शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये १९,६३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो. मात्र, यंदा कोणत्याही शाळेमध्ये अद्याप पूर्णपणे गणवेश वाटप झालेले नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगत विनागणवेश शाळेत येण्यास सांगितले आहे.
एप्रिल-मे या काळात गणवेश खरेदी व निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती. पण, यंदा ती जूनअखेरही पूर्ण झाली नव्हती. त्यानंतर शिवणकाम, साठवणूक आणि वितरण या टप्प्यांत प्रचंड विलंब झाला आहे. यामागे प्रशासनाचा नियोजनशून्यपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
‘‘गणवेश वेळेवर मिळणार नाही, हे माहिती असूनही प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत. गरीब पालकांना नवीन कपडे घेणे शक्य नसते, अशावेळी सरकारी लाभही वेळेत मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग,’’ असा सवाल अनेक पालकांनी उपस्थित केला आहे.
तर, ‘‘एकाच वर्गात काही मुले जुन्या गणवेशात आणि काही मुले घरगुती कपड्यांवर शाळेत येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संकोच निर्माण होतो,’’ अशी खंत अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. ‘‘गणवेशाचे अनुदान दिले आहे. पण, अजून गणवेश मिळालेले नाहीत,’’ असे पंचायत समिती शिक्षण विभागातील एका महिला अधिकाऱ्याने सांगितले.


शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले आहे. आगामी आठ दिवसांत उर्वरित वाटप पूर्ण वाटप करण्यात येईल.
- सुदाम वाळुंज, गट शिक्षणाधिकारी, वडगाव मावळ

शाळा सुरू होऊन एक महिना झाला, तरी गणवेश वाटप का झाले नाही याची चौकशी केली जाईल.
- कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी, वडगाव मावळ


TDB25B03277

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT