प्राथमिक सुविधांची वाणवा
कामशेत ः मावळचे कामशेत हे मुख्य केंद्र बिंदू असून, या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी असते. शालेय विद्यार्थी, कामगार, व्यापारी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. स्थानकात लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा या दोन्ही मार्गीकेमध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे. स्थानकावर प्रवशांची मोठी गर्दी असते. पण, त्यांना बसायला जागा नसते. जागेअभावी अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म खालीच बसलेले असतात. स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही बाक तुटलेले होते. तर काही बाका शेजारी पानाच्या पिचकाऱ्या मारल्याने परिसरात मोठी दुर्ग॔धी पसरली होती. लोणावळा-पुणे प्लॅटफॉर्मवर संरक्षण भिंत तुटलेली आहे. त्याला दोन पत्रे मारलेले आहे. पण, पलीकडे नदी पात्र असल्याने ते प्रवाशांसाठी धोकादायक आहे.
कामशेत प्लॅटफॉर्मवर घाणीचे साम्राज्य पसले असून, संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. प्रवासांसाठी शेडची कमतरता असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
- गिरिश रावळ, प्रवासी
-----------
कामशेत रेल्वे स्थानक