तळेगाव दाभाडे, ता. २८ ः मावळ तालुक्यातील टाकवे गावात सरपटणारा एक दुर्मिळ उभयचर प्राणी आढळला. स्थानिक वन्यजीव रक्षक आणि पर्यावरणप्रेमींच्या तत्परतेमुळे त्याचा यशस्वी बचाव करण्यात आला.
एका बांधकाम स्थळाजवळील पाण्याच्या टाकीत साप असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी मिळाली. त्यांनी तातडीच्या मदतीसाठी शिवदुर्ग मित्र संघटना तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहिदास कालेकर यांच्याशी संपर्क साधला. कालेकर आणि जिगर सोलंकी तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणी केली असता तो साप नसून ‘बॉम्बे सॅसीलियन’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोलंकी यांनी प्राथमिक तपासणी केली असता या दुर्मिळ प्राण्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे आढळले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पकडून मानवी वस्तीपासून दूर निसर्गात सोडण्यात आले.
या प्राण्याचे शरीर लवचिक व मऊसर असते. जमिनीखालील अंधाऱ्या व ओलसर वातावरणात तो राहतो. तो कीटक व इतर लहान प्राणी खातो. त्यामुळे जमिनीतील पर्यावरणातील कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम या प्राण्यामुळे होते. विशेष म्हणजे पश्चिम घाटात आढळणारा स्थानिक प्राणी असला तरी त्याचे दर्शन क्वचित घडते.
याविषयी पर्यावरणतज्ज्ञ सागर महाजन यांनी सांगितले की, “बॉम्बे सॅसीलियन हा अतिदुर्मिळ, संवेदनशील आणि परिसंस्थेसाठी महत्त्वाचा प्राणी आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे.”
---
फोटो आयडी
03890
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.