पिंपरी-चिंचवड

महसूल सेवकांचा मावळात बेमुदत संप सुरू

CD

तळेगाव दाभाडे, ता. २४ ः मावळ तालुक्यातील राज्य महसूल सेवक संघटनेच्या आवाहनानुसार मावळ तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी मंगळवारपासून (ता.२३) बेमुदत कामबंद आंदोलनाला पाठिंबा देत सुरुवात केली आहे. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मावळ तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व महसूल सेवक या आंदोलनात सहभागी झाले असून महसूल सेवक नसल्यामुळे गावस्तरावरील ई-पीक पाहणी, महसुली कामकाज तसेच महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध कामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून शेतकरी व नागरिकांची गैरसोय ही होणार आहे. दरम्यान महसूल सेवक संघटनेने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनानुसार, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कालेकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे, कार्याध्यक्ष रामदास कदम, संभाजी कुटे, सागर जाधव, श्रीपती गायकवाड, गणेश लांगे, गणेश टिळेकर, चंद्रकांत तळपे, राहुल विधाटे यांच्यासह अनेक महसूल सेवक उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Toll Naka: दहिसर टोलनाक्यावरून वाद; 'या' जागी स्थलांतर करण्याचा निर्णय, मंजूरीसाठी प्रताप सरनाईकांची नितीन गडकरींकडे धाव

Asia Cup, IND vs BAN: अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकासह मोडला युवराज सिंगचा विक्रम; मात्र भारताचे बाकी फलंदाज बांगलादेशसमोर फेल

Manchar Accident : मंचर शहरात भरधाव कारची धडक; तरुणी हवेत उडून गंभीर जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Latest Marathi News Update : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिक वर

IND vs BAN : अभिषेक शर्मा ६ चौकार अन् ५ षटकारांची बरसात केल्यानंतर दुर्दैवीरित्या बाद; भारताचा डावही गडगडला

SCROLL FOR NEXT