पिंपरी-चिंचवड

तळेगावात २२ टक्केच मतदार मतदान करणार

CD

तळेगाव दाभाडे, ता. २६ ः नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडेमध्ये तब्बल १९ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ५० हजारापेक्षा जास्त उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळू शकणार नाही. केवळ २२ टक्केच मतदार मतदान करू शकतील.
निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर यांनी ही माहिती दिली. या निवडणूकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी मात्र सर्व ६४,६७६ जण मतदान करू शकतात. त्यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. नगर परिषदेत एकूण जागा : २८ आहेत. मतदान लागलेल्या जागा आहेत.
बिनविरोध निवडीमुळे ११ प्रभागांतील दोन्ही नगरसेवकांच्या मतदानापासून ३७,६९८ मतदार वंचित झाले आहेत. तीन प्रभागांत एका जागेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे तेथील १३,०४१ मतदारांना फक्त एकाच मताचा अधिकार मिळणार आहे. इतर तीन जागांवर मतदान होणार आहे. १३,९३७ मतदारांना सर्व पदांसाठी दोन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी तीन मते देता येतील.
-----
आकडे बोलतात
एकूण मतदार ः ६४,६७६
मतदान करू शकणारे ः २१.५५ टक्के
मतदानाची संधी न मिळणारे ः ७८.४५
---

दृष्टिक्षेपात
बिनविरोध प्रभाग ः मतदारसंख्या
१ ः ५०२०
२ (ब)ः ५३१८
४ ः ४८२५
५ (ब) ः ३३९२
६ ः ४४८८
७ ः ४३३१
९ ः ५८९०
११ ः ५१६२
१२ ः ३७५४
१३ ः ४८५७
१४ ः ३७०२
एकूण वंचित मतदार : ५०,७३९
---

मतदान होणारे प्रभाग
प्रभाग ः मतदारसंख्या
३ ः ५६३५
८ ः ४७७२
१० ः ३५३०
एकूण : १३,९३७
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT