पिंपरी-चिंचवड

तळेगावातील परिषदेला दोनशे शिक्षकांचा सहभाग

CD

तळेगाव दाभाडे, ता. ६ ः नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इमर्जिंग ट्रेंड्स इन रिन्यूएबल एनर्जी, स्मार्ट सिस्टिम्स अ‍ॅण्ड क्लायमेट चेंज मिटिगेशन’ या विषयावर शिक्षक विकास परिषदेचे आयोजन २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले. अटल अकॅडमीद्वारे प्रायोजित या कार्यक्रमासाठी एक लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. देशभरातील दोनशेहून अधिक प्राध्यापक आणि संशोधकांनी या सहा दिवशीय परिषदेत सहभाग नोंदवला.

परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अजय चांडक, एनएमव्हीपीएम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष राजेश म्हस्के, संचालक डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते. नियोजन डॉ. नितीन धवस, डॉ. सतीश मोरे व डॉ. मदगोंडा बिरादार यांनी केले. आयआयटी, एनआयटी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांतील तज्ज्ञांनी तेरा तांत्रिक सत्रांद्वारे नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रीड्स, हवामान बदल नियंत्रण, शाश्वत तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले. संचालक डॉ. पाटील यांनी उपक्रम एनईपी २०२०२ च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे सांगितले. कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश म्हस्के यांनी एनएमआयईटी पथकाचे कौतुक केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. ही परिषद शाश्वत ऊर्जा व तांत्रिक शिक्षणातील एनएमआयईटीच्या प्रगत वाटचालीतील महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

तळेगाव दाभाडे ः परिषदेला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करताना एनएमव्हीपीएम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष राजेश म्हस्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

रिस्क नको, BMCमध्ये सत्तेसाठी भाजप-शिवसेनेच्या सावध हालचाली; महायुती म्हणून नोंदणी करणार, अखेरच्या क्षणी निर्णय बदलला

Donald Trump Trade Policy : डोनाल्ड ट्रम्प पडले एकटे, भारत बनणार जागतिक आर्थिक बदलाचे केंद्र, व्यापारी राजकारण वेगळ्या वळणावर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर घरासमोरच प्राणघातक हल्ला; वार केल्यानंतर पोटात चाकू अडकून बसला अन्...

Arijit Singh Retirement : शेवटी मी धाडस केलं! अरिजीत सिंहने सांगितलं निवृत्तीचं कारण, म्हणाला, मी जगू शकेन

SCROLL FOR NEXT