पिंपरी-चिंचवड

चार प्रभागांतील पाच जागांसाठी तळेगावमध्ये शांततेत मतदान

CD

तळेगाव दाभाडे, ता. २० ः तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या चार प्रभागांतील पाच जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला.
अनेक उमेदवारांनी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचे दर्शन घेऊन सकाळीच मतदान केले. महायुती तसेच अपक्ष उमेदवारांकडून विविध ठिकाणी बूथ उभारण्यात आले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर बुथवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. मतदारांचे नाव, मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधून देण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २१.२७ टक्के मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ही टक्केवारी ३५.८६ होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४६.७५ टक्के मतदान झाले. एकूण १४ प्रभागांतील २८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी १९ जागा बिनविरोध झाल्या. दोन डिसेंबर रोजी चार प्रभागांतील तसेच नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले होते.
मतदान झालेले प्रभाग ः क्रमांक २ अ (सर्वसाधारण महिला), क्र. ७ ब (सर्वसाधारण), क्र. ८ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला), क्र. ८ ब (सर्वसाधारण), क्र. १० ब (सर्वसाधारण महिला).
---
आज निकालाची उत्सुकता
शहरातील २८ पैकी १९ जागा बिनविरोध झाल्या असून नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून संतोष दाभाडे, अपक्ष किशोर भेगडे, रंजना भोसले रिंगणात होते. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने ती कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत निकालाकडे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरवात होणार असून, साधारण दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT