पिंपरी-चिंचवड

तळेगाव दाभाडेत ‘श्री संत चरित्र कथा’ धार्मिक सोहळ्याचे आयोजन

CD

तळेगाव दाभाडे, ता. २४ ः शाळा चौक परिसरातील श्री विठ्ठल मंदिर संस्था यांच्या वतीने शुक्रवार (ता.२६) ते एक जानेवारी २०२६ या कालावधीत ‘श्री संत चरित्र कथा’ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा आरंभ शुक्रवारी दुपारी चार वाजता गणेश भेगडे तसेच जालिंदर महाराज मोरे यांच्या उपस्थितीत कलश पूजनाने होणार आहे.
या सोहळ्यात प्रवचनकार संतोष महाराज काळोखे (देहूकर) संतांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करणार असून दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत संतांच्या जीवनावर आधारित निरूपण होणार आहे. २६ व २७ डिसेंबर रोजी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनचरित्राचे निरूपण होणार आहे. यावेळी दीपक भेगडे हे यजमान म्हणून कार्यरत राहणार आहेत. २८ व २९ डिसेंबर रोजी संत सेना महाराज यांच्या जीवनचरित्राचे निरूपण होणार आहे. यावेळी विनोद भेगडे व केदार भेगडे तर २९ डिसेंबर रोजी सोनाली दरेकर व शोभा परदेशी हे यजमान म्हणून कार्यरत राहणार आहेत. ३० व ३१ डिसेंबर रोजी संत चोखामेळा महाराज यांच्या जीवनचरित्राचे निरूपण होणार आहे. यावेळी पहिल्या दिवशी सत्यम खांडगे तर दुसऱ्या दिवशी मयूर टकले व सुहास गरुड हे यजमान म्हणून कार्यरत राहणार आहेत.
कार्यक्रमाला गणेश महाराज मोहिते, प्रदीप महाराज कुडेकर व ओंकार महाराज मोहिते हे संगीताची साथ देणार आहेत. कार्यक्रमाची सांगता गुरुवार (ता. १) जानेवारी रोजी सकाळी १० वाजता काळोखे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सांगता कै. कासाबाई भेगडे (पाटील) सभागृह येथे होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिर संस्थेचे विश्वस्त बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन शहा, प्रशांत दाभाडे, श्यामराव भेगडे, शेखर गुंड, देवराम महाराज खराटे, हरिदास वनारसे व द्वारकादास थोरात हे सोहळ्याचे नियोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीला ICC कडून झाली शिक्षा! काय झालेली चूक?

Pune Cyber Fraud : ड्रेनेज दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीने ७ कोटी लुटले, पुण्यात सायबर चोरीचा नवा चक्रावणारा प्रकार समोर

Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो...! पूजा सावंतचे अदा पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या डान्सचा viral video

Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

SCROLL FOR NEXT