तळेगाव दाभाडे, ता. ३ : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे भजन-कीर्तनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. दोन वेगवेगळ्या प्रकारांत ही कारवाई करण्यात आली. यात सोन्याचे लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.
पहिल्या प्रकारात माया गुरव यांच्या गळ्यातील सुमारे ४० ग्रॅम सोन्याचे दागिने गर्दीत चोरीला गेले. याप्रकरणी वत्सला गायकवाड (वय ६०) व कस्तुराबाई लोखंडे (वय ६२) या दोघींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरा प्रकार भंडारा डोंगराच्या पायथ्याशी घडला. तेथे शांताबाई चव्हाण या ज्येष्ठ महिला दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांच्या गळ्यातील सुमारे ६२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करताना दोन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गौळण गायकवाड (४०) आणि प्रीती मोहिते (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे तीन लाख ७२ हजार रुपये आहे.
या सर्व आरोपी मूळच्या बीडच्या रहिवासी आहेत. पुढील तपासासाठी त्यांना बीडला नेण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर करीत आहेत.
दरम्यान, एकाच दिवशी चोरीचे दोन वेगवेगळे प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गर्दीच्या ठिकाणी भाविकांनीही सतर्क आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.