तळेगाव दाभाडे : खडकाळा-कार्ला गटातील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपाली दीपक हुलावळे यांनी भाजपच्या आशा बाबुराव वायकर यांचा सहा हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने आशा वायकर यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने दीपाली हुलावळे यांना उमेदवारी देत लढत प्रतिष्ठेची केली. बाबुराव वायकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून महिला आरक्षणामुळे त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे, एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या पत्नी दीपाली हुलावळे यांना राष्ट्रवादीने संधी दिली.
आमदार सुनील शेळके व दीपक हुलावळे यांचे घनिष्ठ संबंध असल्याने या मतदारसंघावर शेळके यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. दोन दिवसांपूर्वीच दीपाली हुलावळे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले होते. मतमोजणीत दीपाली हुलावळे यांना १७,६९३ मते, तर आशा वायकर यांना ११,६५८ मते मिळाली.
TDB26B04596
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.