पिंपरी-चिंचवड

कणगा, लागला रे...

CD

दक्ष काटकर : सकाळ वृत्तसेवा
टाकवे बुद्रुक, ता. ४ : शेतकरी भातपेरणी करण्याच्या अगोदर देवासमोर भात ठेवून पेरणी करतो अन् भातलावणी पूर्ण झाल्यावर देखील देवाला नमस्कार करतो. भातलावणी पूर्ण झाल्यानंतर देवाला कृतज्ञता व्यक्त करणारा क्षण, आनंदोत्सव म्हणजेच कणगा लावणे. ही कणगा लावण्याची ही शेतीसंस्कृतीची परंपरा मावळ भागातील काही शेतकऱ्यांकडून अजूनही जपली जात आहे.
भातलावणी उरकली की शिवाराच्या एका कोपऱ्यावर चिखलाचा गोळा करून त्याला शेणाने सारवून घेतले जाते. त्यावर थोडी भातरोपे गोलाकार लावून त्यास नैवेद्य दाखविला जातो. हळद-कुंकू वाहून पूजा केली जाते. रानफुले वाहिली जातात, नारळ फोडून धने आणि गूळ एकत्र करून प्रसाद वाटप केला जाते. या दिवशी रात्रीच्या वेळी घरी खीर-चपाती, भजी, गोड-धोड बनवून शिवारात काम केलेल्या सर्व शेतकऱ्यांना जेवण करण्यास आमंत्रित केले जाते. घरच्या सर्जा-राजाला अंघोळ घातली जाते. शेती अवजारे पूजन झाले की बैलांनाही पुरण-पोळी किंवा भाकरीचा घास भरवला जातो.

यंदा पडकईमुळे भातलावणी पूर्ण
यंदा सर्व ठिकाणी भातलावणीसाठी मजुरांचा तुटवडा दिसत होता. पण पडकईमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची भातलावणी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी याला ‘सवड’ असा हा शब्दप्रयोग केला जातो. आजूबाजूचे दहा ते पंधरा शेतकरी कुटुंबातील महिला एकत्र येऊन एकमेकांच्या शेतात आलटून पालटून भात लावणीसाठी जातात. जवळ-जवळ महिनाभर या दहा-पंधरा महिला शेतात राबत पारंपरिक गाणी म्हणत आनंदाने सामुदायिक भातलावणी पूर्ण करतात.

पेरणी करण्याचे काम शेतकरी करतो पण त्या पिकात दाणे भरण्याचे कार्य परमेश्वर करत असतो. हीच भावना मनात ठेवत देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भातलावणी कणगा लावून पूर्ण केली जाते.’’
- तुकाराम आगळमे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: राज्याचा नेता असूनही धनंजय मुंडेंचा बॅनरवर फोटो का नाही? बाबरी मुंडेंनी स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Updates Live : चिखलीत अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

PUBG Game Incident: पुण्यात 'PUBG' खेळताना घडला थरार!, मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात खरंच सुटली गोळी अन्..

शी... काही पण! सैयारा फेम अहान पांडेने खाल्ले विंचू? व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'एवढा घाणेरडा...'

Genital Feature Mapping: प्रज्वल रेवण्णा प्रकरणात आरोपीच्या शिक्षेसाठी 'जेनिटल फीचर मॅपिंग'चा वापर, ते नेमके काय आहे? कसे काम करते?

SCROLL FOR NEXT