पिंपरी-चिंचवड

रस्त्याच्या मधोमध आणि बाजूलाही खड्डे

CD

तळेगाव स्टेशन, ता. २१ : तळेगाव-चाकण महामार्गावर फलकेवाडी ते माळवाडी दरम्यानच्या दोन किलोमीटर टप्प्यात रस्त्याच्या मधोमध आणि बाजूच्या पट्ट्यांवरही मोठे खड्डे पडले आहेत. या व्यस्त महामार्गाच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) सतत दुर्लक्ष होत आहे.
प्राणघातक अपघातांची वाट पाहण्यापेक्षा महामंडळाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सेवाधाम रुग्णालय, जनरल हॉस्पिटलची सीमा भिंतीसमोर, स्त्री शक्ती भाजीमंडई अशा ठिकाणी खड्डे आहेत. माळवाडीतही खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे.
नगरपरिषदेच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी सतत होणारी गळती आणि आणि पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाहने खड्ड्यात आदळून वाहनचालकांची हाडे खिळखिळी होत आहेत.
अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने खडीचे थर साचले आहेत. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यावरुन जाताना दुचाकीस्वारांसाना कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या भरलेल्या नसल्याने त्यात चिखल, गाळ साचतो. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांचा तोल जातो. माळवाडी ते मनोहरनगर दरम्यान मावळी थाट हॉटेलशेजारी वाहिनी टाकण्यासाठी गतवर्षी आरपार खोदलेल्या रस्त्यावरही मोठा चर तयार झाला असून. या खड्ड्यांत वाहने आदळत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना तर रस्त्यावरून मुठीत धरुन चालावे लागते.
दरम्यान, रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या श्री असोसिएट्सचे अधिकारी संदीप धुमाळ यांनी सांगितले की, पावसाची उघडीप मिळाल्यानंतर खड्ड्यांची व्यवस्थित दुरुस्ती केली जाईल.
---
सोशल मिडीयाचा आधार
तळेगाव-चाकण रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येवर आवाज उठविण्यासाठी नागरिकांना सोशल मिडीयाचा आधार मिळाला. छायाचित्रे आणि चित्रफिती व्हायरल करून नागरिकांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची मागणी केली.
---
बऱ्याच पाठपुराव्यानंतर तळेगाव-चाकण महामार्गावरील खड्डे आठवड्याभरापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते, मात्र त्यानंतर जोरदार पाऊस आल्याने खड्डे पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
- अमित प्रभावळकर, सचिव, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समिती
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणार 'वर्क फ्रॉम होम', सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : दहिसरमधील भंगार दुकानाला आग

PMC News : चिंधीचा कचरा प्रकल्प ‘कचऱ्यात’; अर्थसंकल्पात तरतूद करण्यावर बंदी!

T20 World Cup 2026: भारत - पाकिस्तान पुन्हा भिडणार! भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाची अपडेट

Success Story : मेंढपाळ कुटुंबातील गणेश करगळ वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड; थोरांदळे गावाचा अभिमान!

SCROLL FOR NEXT