तळेगाव स्टेशन : शनिवारपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने तळेगाव दाभाडे, स्टेशन, वराळे, आंबी, माळवाडी परिसरात मध्यरात्री रौद्ररूप धारण केले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रविवारी मध्यरात्रीनंतर दोन तीन तास पडलेल्या पावसामुळे परसरातील रस्ते जलमय झाले होते. सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला. तळेगाव-चाकण रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांत साचल्याने रस्त्यांना डबक्याचे स्वरुप आले आहे. दुचाकीस्वारांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरातील अंतर्गत रस्त्यांसह चौकातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.