पिंपरी-चिंचवड

दिवाळीनिमित्त तळेगावात खरेदीचा आनंद

CD

तळेगाव स्टेशन, ता. १६ : बोचऱ्या थंडीत घरे, इमारती, दुकाने आदींवर चढलेला विद्युत रोषणाईचा साज, रांगोळीने सजलेल्या अंगणात एका कोपऱ्यात मातीच्या किल्ल्याच्या बांधणीची सुरू असलेली तयारी आणि खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजरपेठांमुळे चैतन्यमय वातावरण र्निमितीमुळे पुढील आठवडाभर तळेगाव दाभाडे शहरासह मावळातील घरोघरी दिवाळीचा आनंद फुलणार आहे.
नवरात्रोत्सवानंतर पावसाने उघडीप दिल्याने मावळात जागोजागी फुललेल्या रानफुलांच्या सुवासाने दरवळलेल्या निरभ्र आसमंतात दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली. अश्विन पौर्णिमेपासून ठिकठिकाणच्या मंदिरात सुरू झालेल्या काकडा आरत्यांच्या सुरांनी त्यात रंग भरला. भाद्रपदी बैलपोळ्यानंतर मूर्तीकारांनी दिवाळीसाठी पणत्या, किल्ले, चित्रे, लक्ष्मीच्या मूर्ती बनविण्याची तयारी सुरू केली. दिवाळीसाठी मॉल आणि किराणा मालाची दुकानेही मालाने भरलेली दिसत आहेत. दिवाळी तीन चार दिवसांवर येऊन पोहोचल्याने कपड्यांची दुकाने, मिठाई भांडार, विद्युत रोषणाईची दुकाने झगमगून निघालेली दिसत आहेत. विविध रंग, रचनांचे आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कृत्रिम फुलांच्या माळा अन् तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. किराणा माल आणि सुकामेव्याचे भाव यंदा काहीसे स्थिर असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी तेजी जाणवते आहे. बहुतांश जणांचा तयार फराळ खरेदीकडे वाढता कल लक्षात घेता तयार फराळाच्या विविध पदार्थांच्या दरांसह समाजमाध्यमांवर जाहिरातींद्वारे विक्रीसाठी क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. रेडिमेड कपड्यांच्या दुकानांसमोरील पुतळ्यांवर नवनवीन, रंगीबेरंगी आणि फॅशनेबल कपड्यांचा साज चढलेला दिसत आहे. बच्चेमंडळी आणि तरुणाई साहजिकच तिकडे कपडे खरेदीसाठी पालकांकडे अट्टहास धरताना नजरेस पडते आहे. चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या आवारात आणि मारुती मंदिर चौकालगत तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर फटाक्यांची दुकाने थाटली आहेत.
मारुती मंदिर चौक, स्टेशन रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वराळे रस्त्यावर तसेच चाकण रस्त्यावर देखील ठिकठिकाणी छोटे, मोठे स्टॉल लागले आहेत. त्यात दिवाळीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य, पणत्या, रांगोळी, केरसुणी विक्रीसाठी हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी पुढील दोन दिवसांत तळेगावातील बाजारपेठांत दिवाळीचा उत्साह आणखी फुलणार आहे.

लक्ष्मीपूजनाला कर्नाटकातील केरसुणी
यंदा लांबलेल्या जोरदार पावसामुळे उघडीप न मिळाल्याने शिंदाडाच्या झाडाची पाने वाळवून, झोडून कच्चा माल तयार करता न आल्याने लक्षमीपूजनाला मान असलेली केरसुणी थेट कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातून आयात करावी लागली. यंदा आकारानुसार ४० ते ७० रुपये प्रतिनग भाव आहे. त्यातही लोक आणखी कमी भावाची अपेक्षा ठेवतात. एक हजार केरसुण्या विक्रीसाठी आणल्या असून, वाहतूक खर्च वगळता किमान १० रुपये तरी नफ्याची अपेक्षा आहे. तळेगावातील पारंपरिक केरसुणी विक्रेत्या शोभा जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT