पिंपरी-चिंचवड

सावधान! ‘मीशो.डॉट कॉम’वर क्लिक करू नका

CD

तळेगाव स्टेशन, ता. १० : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोबाईलवर अनोळखी क्रमांकांकडून ‘मीशो.डॉट कॉम’ हा शब्द असलेली लिंक व्हाट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर पाठविण्यात येत आहे. या संदर्भातील चर्चांचे प्रमाण वाढल्याने पोलिस व सायबर क्राइम विभागाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ही बनावट लिंक कोणीही उघडू नये, अशी सूचना विभागाकडून करण्यात आली आहे.

या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते हॅक होऊन पैसे चोरी होऊ शकतात, असे धोकाही वाढले आहे. असे अनेक संदेश प्रसारित होत असून, काही व्यक्तींनी खात्यातून पैसे चोरी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लिंक मिळाल्यास ती लगेच डिलीट करा आणि कोणालाही फॉरवर्ड करू नका. शंका असल्यास त्वरित १९३० या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे सूचित केले जाते.
स्थानिक पोलिस प्रशासन व मोबाईल विक्रेत्यांकडून चौकशी केली असता ही लिंक ऑनलाइन फ्रॉडचा एक प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही मेसेजेमध्ये चार प्रश्नांची उत्तरे द्या आणि आयफोन १७ प्रो मॅक्स मिळवा, अशी फसवणूक करणारी जाहिरात असते. प्रत्यक्षात अशी काहीही देयक नसून, ही लिंक उघडल्यास मोबाईल हॅक होतो; मोबाईल गरम होणे, बॅटरी डाउन होणे किंवा मोबाईलमधून बारीक आवाज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे असा लिंक ओपन न करता त्या डिलीट करून फ्रॉड मेसेज पाठविणारा संबंधित मोबाईल क्रमांक ब्लॉक करावा.
- बाबा चौरे, मोबाईल विक्रेता, सिद्धी कम्युनिकेशन, तळेगाव दाभाडे

अशा फसवणूक मेसेजबाबत आजपर्यंत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. फेसबुक, व्हाट्सअॅप अथवा इन्स्टाग्रामवरील मार्केटिंग लिंक कधीही उघडू नयेत, अन्यथा मोबाईल हॅक होण्याचा धोका असतो. जर शंका असल्यास १९३० आणि १९४५ या टोल-फ्री क्रमांकांवर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तातडीने तक्रार नोंदवावी.
स्वाती पाटील, सायबर क्राईम विभाग, तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT