पिंपरी-चिंचवड

तळेगावमध्ये उद्या मतदानाची दुसरी फेरी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १८ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी (ता. २०) होत आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी गुरुवारी (ता. १८) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नगरपरिषदेच्या २, ७, ८ आणि १० या प्रभागांमधील नगरसेवकपदाच्या एकूण पाच जागांसाठी मतदान होईल. त्यासाठी या चार प्रभागांमध्ये २० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक दोन करिता एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे ६ मतदान केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक सात करिता माउंट सेंट अॅन हायस्कूलच्या मुख्य इमारतीत पाच मतदान केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक आठ करिता नवीन समर्थ विद्यालयात तीन, तर सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये दोन मतदान केंद्रे असतील. प्रभाग क्रमांक दहाकरिता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत चार मतदान केंद्रे असतील. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.
निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता. २१) सकाळी १० वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे. मतमोजणीसाठी दोन नोडल अधिकारी, १४ विभागीय अधिकारी आणि २८ मतमोजणी सहाय्यक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. नगरपरिषदेचे ६० कर्मचारी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. शुक्रवारी (ता. १९) रात्री दहानंतर कोणताही प्रचार, सभा किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही, असे अर्चना तांबे यांनी स्पष्ट केले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्र निमित्त वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात महास्वच्छता अभियान

Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग! आगीचा भडका अन् धुराचे लोट परिसरात पसरले; घटनेनं भीतीचं वातावरण, Video Viral

SCROLL FOR NEXT