वडगाव मावळ, ता.२ : हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. यानिमित्त मावळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील पुरस्कार प्राप्त, कर्तृत्ववान व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. तुकाराम भोर, भागवत सपकाळ, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, संताजी जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
भागवत सपकाळ यांनी बांबू विषयावर मार्गदर्शन केले. बांबूच्या विविध जाती, त्यांच्यापासून तयार होणारी विविध उत्पादने, बांबूची शेती कशी फायदेशीर आहे याची माहिती त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेमध्ये बांबू लागवडीसाठी भरीव अनुदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम भोर यांनी संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या भाताच्या विविध जातींची माहिती दिली.
तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, पीएम किसान, फळबाग लागवड, ॲग्रिस्टेक इत्यादी योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संताजी जाधव, सेवक थोरात यांनी पंचायत समितीच्या विविध योजना, रोजगार हमी योजना, उपक्रम याबद्दल माहिती दिली.
शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन गायकवाड, पुणे फ्लोरिकल्चर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष नितीन जगताप, दारुंब्रे येथील आनंदमळा कृषी पर्यटन केंद्र केंद्राचे समीर वाघोले, शिवलीचे संदीप आडकर यांनी व्यवसायातील अनुभव कथन केले.
कृषी पर्यटनात उत्कृष्ट काम करणारे श्रीकांत चव्हाण (रानफुला ॲग्रो टुरिझम इंगळून), राहुल जगताप (अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र, शिळींब), समीर वाघोले (आनंद मळा कृषी पर्यटन केंद्र, दारूंब्रे), कृषी विस्ताराचे काम उत्कृष्टपणे करणारे राहुल घोगरे, प्रवीण गाडे, संकेत खानेकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपत गारगोटे यांनी सूत्रसंचालन केले. वासंती बोराटे, अपूर्वा पाटील, दीपक राक्षे, प्रियंका मालपोटे, सुनील राऊत, नयना नाईक यांनी संयोजन केले.
१. पुरस्कार प्राप्त शेतकरी (खरीप हंगाम सन २०२३-२४) : गबाजी दहातोंडे, तुकाराम लष्करी, नामदेव खांडभोर, रामेश्वर नवघणे, गबाजी निंबळे, किसन चिमटे, नारायण हेमाडे, बबन हेमाडे, चंदर केंगले, पांडू दाते.
२. रब्बी ज्वारी पुरस्कार प्राप्त शेतकरी (रब्बी हंगाम सन २०२३-२४): राजेंद्र आगळमे, मालती आनंद शिंदे, संतोष भांगरे, मारुती शेलार.
३. खरीप हंगाम सन २०२४-२५ : कुसुम तुकाराम लष्करी, सुरेश वाघमारे, वासुदेव लखिमले, गोरख चोरघे, भाऊ मोरमारे.
वडगाव मावळ : राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन गायकवाड यांचा सन्मान करताना कृषी अधिकारी.
VDM25B10042
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.