वडगाव मावळ, ता. ११ : मावळ तालुक्याचा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३४ टक्के तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २० टक्के लागला. दोन्हींमधील एकूण ६४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
मावळ तालुक्यात पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळेतील एक हजार ७३१ विद्यार्थी बसले होते. त्यातील ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. खासगी शाळेतील एक हजार ३८६ विद्यार्थी बसले होते. त्यातील ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले व २३ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. जिल्हा परिषद व खासगी मिळून तीन हजार ११७ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ३९ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळेचे ५४ विद्यार्थी बसले होते. त्यातील ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व एक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. खासगी शाळेतील एक हजार ५६६ विद्यार्थ्यांनी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील ३०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.