पिंपरी-चिंचवड

वडगाव नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम

CD

वडगाव मावळ, ता. १७ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत आठवडाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वडगाव नगरपंचायतीने मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ या अभियानांतर्गत शहरात विविध जनजागृती उपक्रम राबविले. यात बुधवारी (ता. ६) न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता व तिरंगा शपथ घेतली. त्यामध्ये एक हजार ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. गुरुवारी (ता. ७) न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी, पोदार इंटरनॅशनल स्कूल व सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये पर्यावरण पूरक तिरंगा, राखी स्पर्धा, तिरंगा रांगोळी, चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजूषा, तिरंगा दौड, पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, भारतीय जवानांसाठी पत्र लेखन, तिरंगा सेल्फी आदी उपक्रम राबविले. न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयात पर्यावरणपूरक राखी स्पर्धा घेण्यात आली. यात दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शुक्रवारी (ता. ८) न्यू इंग्लिश स्कूल येथे तिरंगा चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. नगरपंचायत कार्यालयात तिरंगा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. अनेक नागरिकांनी येथे सेल्फी घेतली. सोमवारी (ता. ११) शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांत जाऊन सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. १२) जिल्हा परिषद शाळा, केशवनगर व न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचा प्रवास याबाबत लघू चित्रपट दाखवून त्यावर प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे एक हजार ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. केशवनगर येथील शाळेत तिरंगा राखी बनवणे स्पर्धा घेण्यात आली. बुधवारी (ता. १३) पंचायत समितीजवळील जिल्हा परिषद शाळेत सुमारे २५० विद्यार्थ्यांच्या सहभागाने तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगाचे वाटप करून नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवणे व अभियानाची जनजागृती करण्यात आली. गुरुवारी (ता. १४) शहरातील बाजारपेठ, केशवनगर, म्हाळसकरवाडी, संभाजीनगर, डेक्कन हिल, माळीनगर या भागांतून मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूलच्या सहभागाने मुख्य बाजारपेठेत तिरंगा प्रदर्शन रॅली काढण्यात आली. यात सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे चित्रकला, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनी शहरात एलईडी स्क्रीनद्वारे शहरात ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियान जागृती करण्यात आली. या उपक्रमांमध्ये शहरातील विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''९० व्या वर्षीही मी काम करायचं का?'', पुण्यातील 'त्या' पोस्टरवरून संतापले अण्णा हजारे...दिलं चोख प्रत्यूत्तर!

Accident News: शीळफाटा रोडवरील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

MS Dhoni भारतीय संघाचा कोच होणार? चर्चेला उधाण; माजी क्रिकेटर म्हणतोय, कठीण काम...

Air Force Gallantry Medal:'पराक्रम हीच मराठी रक्ताची ओळख'; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील पराक्रमाने देवेंद्र औताडे यांना वायुसेनेचे शौर्य पदक

Latest Marathi News Updates : आशिया कप हॉकी स्पर्धेच्या लोगो अन् ट्रॉफीचे अनावरण; बिहारमध्ये रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT