पिंपरी-चिंचवड

मावळला अतिवृष्टीने तडाखा

CD

वडगाव मावळ, ता. २० : मावळ तालुक्यात पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. पण, दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले. सखल भागांत पाणी साचून रस्ते ठप्प आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, लोणावळा येथे दोन दिवसांत तब्बल ५७४ , तर कार्ला येथे ४६० मिलिमीटर पाऊस झाला.
संततधार आणि मध्येच मुसळधार पाऊस, त्यातच धरणातून विसर्ग केल्यामुळे नद्या व ओढे नाल्यांना पूर आला. विशेषतः पवना व इंद्रायणी नदीला मोठा पूर आल्याने दळणवळणाचे अनेक पूल पाण्याखाली गेले.
आंदर मावळात ठोकळवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक भात खाचरे जलमय झाली आहेत. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने अनेक गावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजना, पीठ गिरण्या, छोटे मोठे व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. संततधार पावसाचा बाजारपेठेतील उलाढालीवरही परिणाम झाला आहे. तालुक्यातील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

परिसर आणि परिस्थिती
- पवना नदीवरील कोथुर्णे, ब्राह्मणोली, कडधे, गोडुंब्रे आदी पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक बंद
- इंद्रायणी नदीला पूर आल्याने टाकवे गावचा जुना पूल पाण्याखाली
- नाणे पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता पाण्याखाली गेला
- इंद्रायणीच्या पुरामुळे कार्ला-मळवली परिसर जलमय
- वाकसई-सदापूर, मळवली-सदापूर, मळवली-देवले, कार्ला-वेहेरगाव रस्ते पाण्यात
- अनेक बंगले व घरांमध्ये पाणी शिरले.
- गोडुंब्रे येथे पवना नदी पात्रात अडकलेल्या महिलेची वन्यजीव रक्षक, पोलिस व ग्रामस्थांनी सुटका केली


धरणांतून विसर्ग सुरूच
बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे धरणातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला. बुधवारी सायंकाळी पवना धरणातून ११ हजार ६९० क्युसेक, तर वडिवळे धरणातून पाच हजार २१६ क्युसेक विसर्ग सुरू होता. आंद्रा धरणातून तीन हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू होता. हे प्रमाण कमी केल्याने पुलांवरील पाणी ओसरू लागले. इतर गैरसोयी कायम होत्या.

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. पूल व रस्ते पाण्याखाली असल्यास तेथून वाहने नेऊ नयेत. पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ

बुधवारी सकाळपर्यंतचा पाऊस (मिलीमीटर)
लोणावळा-४३२, कार्ला-३५७, खडकाळा- १७२, वडगाव-१४७, पवनानगर व तळेगाव दाभाडे-१३८, शिवणे-१२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT