पिंपरी-चिंचवड

मावळमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा पंधरवडा’

CD

वडगाव मावळ, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीमध्ये मावळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
तहसीलदार देशमुख यांनी सांगितले, सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंधरवड्यात राबवावयाचे उपक्रम हे यापूर्वीपासून राबविण्यात येत असून पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत. मात्र, या कालावधीत हे उपक्रम मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात तीन टप्प्यात उपक्रम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात (१७ ते २२ सप्टेंबर) पाणंद रस्तेविषयक मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये पाणंद/शिवरस्त्यांना क्रमांक देण्याबाबतच्या महसूल विभागाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही करणे. शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे. ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे. शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे. अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील नियमानुकूल करणे. विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करून त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे. या योजनेतंर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या/अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप करणे. खासगी मिळकतधारकांना पट्टे वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) स्थानिक गरजा व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT