पिंपरी-चिंचवड

शिवरायांचा आदर्श घेत तरुणांनी ध्येय गाठावे

CD

वडगाव मावळ, ता.२४ : ‘‘प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जो पर्यंत ध्येय गाठत नाही; तो पर्यंत तरुणांनी पुढे झेपावत राहावे. यश तुमच्या स्वागतासाठी निश्चित तयार असेल,’’ असा विश्वास शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.
नवरात्रीनिमित्त येथील मावळ विचार मंचामार्फत आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे होते. प्रमुख पाहुणे उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बबनराव भोंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, रामदास गाडे, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, ॲड.दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत आदी उपस्थित होते.
बानगुडे पाटील म्हणाले, ‘‘शिवरायांनी अवघ्या ३५ वर्षांत पारतंत्र घालवून लोक कल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांच्या आदर्शांवर व विचारांवर आपल्या पिढ्या न पिढ्या पोसल्या गेल्या. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत. त्याच प्रमाणे जी माणसे मनातून पराभूत असतात; ती रणात जिंकू शकत नाहीत. कोणत्याही अडीअडचणी आल्यास कोणतीही कारणे न सांगता पर्याय निर्माण करा.’’ यावेळी उद्योजक विलास काळोखे यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सपना म्हाळसकर यांनी मानपत्र वाचन केले. अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले. कुलदीप ढोरे यांनी आभार मानले.

VDM25B10577

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीला पुन्हा मुदतवाढ

Gondia News : रुग्णवाहिकेला आग; ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; वर्कशाॅपचे नुकसान!

Lohara Bribe News : पाच लाखांची डील पोलिसांना पडली महागात; प्रभारी अधिकाऱ्यासह चार पोलिस निलंबित

Narayangaon Crime : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी जीएमआरटी प्रकल्पातील कंत्राटी कामगारासह दोन जणांना अटक!

Akola News : मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा बदलला! प्रारूप यादी २० नोव्हेंबरला, अंतिम यादी ५ डिसेंबरला

SCROLL FOR NEXT