वडगाव मावळ, ता. २४ : नवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने येथे २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा दौड आयोजित करण्यात आली आहे. येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून दररोज पहाटे साडेपाच वाजता ही दौड सुरू होईल. सात दिवस शहराच्या विविध भागांमध्ये ती नेण्यात येईल. दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये शस्त्रपूजन केले जाईल. संध्याकाळी सात वाजता चावडी चौकात रावण दहनाचा कार्यक्रम होईल.