पिंपरी-चिंचवड

दिव्यांग विद्यार्थी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वडगाव मावळ, ता. २८ : पुणे जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व मावळ पंचायत समिती समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय साहित्य साधने मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज व विस्तार अधिकारी संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनीच्या सीएसआर निधीअंतर्गत डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाच्या सभागृहात हे शिबिर घेण्यात आले. यात कर्णदोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता प्रवर्गातील ४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून श्रवण यंत्र, व्हीलचेअर, कॅलिपर, मॉडीफाय चेअर, टीएलएम किट आदी साहित्य साधनांसाठी संदर्भित करण्यात आले. कंपनीचे सीएसआर व्यवस्थापक अमोल फटाले, मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड, डॉ. स्वाती मगरे, अश्विनी वनारसे आदींचे सहकार्य मिळाले. ज्योती लावरे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. शीतल शिशुपाल यांनी स्वागत केले. साधना काळे यांनी आभार मानले. सुमित्रा कचरे, शकीला शेख, स्मिता जगताप, लता वनवे, गणेश दबडे, नवनाथ दर्शले, वैशाली गायकवाड, मनीषा तनपुरे, वंदना बेलसरे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मोठी बातमी! अमृतसर सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डब्बे गाडीपासून वेगळे झाले, मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली

Jalgaon News : दिवाळीत पुणे-जळगाव प्रवासासाठी विमानसेवेला 'पसंती'; महिनाभराअगोदर तिकीट बुकिंग जोमात

Crime News : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या दोघा भावांवर झाडल्या गोळ्या; मेहुण्यानेच जेलमधून 'या'मुळे घडवले दुहेरी हत्याकांड

Explained: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय? रक्तातील साखर कमी होण्यापासून बचावासाठी पाळा या सोप्या सवयी!

"एअरपोर्टवर जाण्यासाठी निघणार तितक्यात फोन आला.." ; गायत्री दातारने सांगितली हातातून गेलेल्या सिनेमाची गोष्ट

SCROLL FOR NEXT