पिंपरी-चिंचवड

वडगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान

CD

आज ठरणार ‘गावकारभारी’

वडगाव, तळेगाव, लोणावळ्यात तयारी पूर्ण; मतदानाचे साहित्य रवाना

वडगाव मावळ, ता. १ : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या ४३ जागांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होत आहे. तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवक पदाच्या चार जागांसाठी ११, लोणावळा येथे नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी ७२ तर वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतेक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. गेल्या आठ दिवसांत प्रचाराचा धुरळा उडाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दरम्यान, तीनही शहरात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.
वडगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ४५ असे ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे, भाजपच्या ॲड. मृणाल म्हाळसकर, वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे व अपक्ष उमेदवार नाजमाबी शेख या चौघी जणी रिंगणात आहेत. नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून, त्यात ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपदासह प्रत्येकी १७, शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष प्रत्येकी एक जागा लढवत आहे. त्यामुळे बहुतांशी जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये लढत आहे. आठ जागांवर दुरंगी, पाच जागांवर तिरंगी व तीन जागांवर चौरंगी लढत आहे. त्यातील काही उमेदवारांनी प्रचार न करता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची करून गेल्या आठ दिवसांत प्रचाराची राळ उडवून दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

मतदान साहित्य रवाना
मतदानासाठी २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करून त्यांना पोलिस बंदोबस्तासह मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानाची वेळ असून मतदारांनी मतदानाला जाताना सोबत सोळापैकी एक ओळखीचा पुरावा सोबत नेणे आवश्यक आहे. निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वडगावमधील मतदान केंद्रे
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केशवनगर : प्रभाग १ व २
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कातवी : प्रभाग २
- रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल : प्रभाग ३ ते ८
- सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय : प्रभाग ९ ते ११
- न्यू इंग्लिश स्कूल : प्रभाग १२ ते १५
- पोदार इंटरनॅशनल स्कूल : प्रभाग १६ व १७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT