पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी

CD

वडगाव मावळ, ता. १२ : वैद्यमापन शास्त्र विभागाने नुकतीच श्री. संत तुकाराम साखर कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करून प्रमाणपत्र प्रदान केले.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ गळीत हंगाम सुरू झाला असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली व शिरूर या तालुक्यांतील ऊस गाळपासाठी येत आहे. १० डिसेंबरपर्यंत १ लाख १२ हजार ३५ मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन १ लाख ३ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुण्यातील वजन काटा भरारी पथकातील वैद्यमापन अधिकाऱ्यांनी १० डिसेंबर रोजी कारखान्यावर अचानक येवून वजन काट्याची तपासणी केली. उसाने भरलेल्या व रिकाम्या झालेल्या वाहनांची वजन काट्यावर सर्वांच्या समक्ष तपासणी करण्यात आली. वैद्यमापन शास्त्र उपनियंत्रक आर. ई. गवंडी, वैद्यमापन शास्त्र चिंचवड विभागाचे निरीक्षक आर. एस. परदेशी यांनी वजन काटा तंतोतंत असल्याचे प्रमाणपत्र कारखान्याला दिले. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. पठारे, मुख्य अभियंता आर. बी. जगदाळे, प्रभारी सचिव एम. टी. काळोखे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर गणेश शिंदे, केनयार्ड सुपरवायझर देविदास उभेव आदींसह केनयार्ड विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Solapur Crime : ‘हलगी का वाजवत जातोस?’ म्हणत हल्ला; बार्शीच्या वांगरवाडीत चार जणांविरोधात 'ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT