पिंपरी-चिंचवड

मावळात निवडणुकीचा प्रचार पुन्हा सुरू

CD

भपकेबाजपणा टाळून मावळात प्रचार सुरू

अजित पवार यांच्या दुखवट्यानंतरची स्थिती; उमेदवारांची गाठीभेटीवर भर

वडगाव मावळ, ता. २ : तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर मावळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा सुरवात झाली आहे. मात्र, प्रचारातील भपकेबाजपणा टाळून उमेदवारांचा मतदारांच्या गाठीभेटीवर अधिक भर दिसून येत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.२८) अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला व धामधुमीची जागा शोककळेने घेतली. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस संपल्यानंतर उमेदवारांनी बुधवारपासून गावनिहाय प्रचार दौऱ्यांचे नियोजन केले होते. मात्र, सकाळीच दुःखद घटना घडल्याने शोकमय वातावरणामुळे प्रचार जागीच ठप्प झाला. शासनानेही तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या राजकीय हालचाली, सभा, प्रचार आणि कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. एकूणच निवडणुकीचे वातावरण थंड झाले होते. निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल केला असून आता ७ तारखेला मतदान तर ९ तारखेला मतमोजणी होणार आहे.

प्रचाराला पुन्हा सुरवात
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर व तीन दिवसांचा शासकीय दुखवटा संपल्यानंतर तालुक्यात राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा सुरवात केली आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ असे १५ जागांसाठी एकूण ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इंदोरी-वराळे, खडकाळा-कार्ला, सोमाटणे-चांदखेड या जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये दुरंगी,टाकवे बुद्रुक-नाणे गटात तिरंगी तर कुसगाव बुद्रुक-नाणे या जिल्हा परिषद मतदार संघात चौरंगी लढत होत आहे. पंचायत समिती गणांमध्ये वराळे, काले, चांदखेड या गणांमध्ये दुरंगी, टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, खडकाळा, कार्ला, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे या गणांमध्ये तिरंगी सामना आहे. लढतींचे स्वरूप बहुरंगी असले तरी बहुतेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांमध्येच थेट लढत होणार आहे. निवडणुकीची तारीख पुढे गेल्याने प्रचाराला दोन दिवस अधिक मिळणार आहेत. त्यामुळे प्रचाराने पुन्हा जोर धरला आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. भडक प्रचार टाळून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. परिचय पत्रके व जाहीरनाम्यांचे वाटप केले जात आहे. ग्रामीण भागातही आता मोबाईलचा वापर वाढल्याने सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी कलश यात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात प्रचाराबरोबरच ही कलश यात्राही सुरू आहे. मतदारांना भावनिक आवाहन केले जात आहे. आता प्रचाराचे अवघे तीन दिवस राहिल्याने प्रचाराला आणखी वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यातील तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

माझ्याच मित्रांनी माझ्या मागे कारस्थान केलं... सागर कारंडेने सांगितलं इंडस्ट्रीचं खरं रूप; म्हणाला, 'तुमचा वापर टिशु पेपरसारखा...'

Baramati News : बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचे नामांतर

SCROLL FOR NEXT