पिंपरी-चिंचवड

मतमोजणीची तयारी पूर्ण; एकूण १७ फेऱ्या होणार

CD

वडगाव मावळ, ता. ८ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सोमवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरवात होईल. मतमोजणीसाठी २५ प्रशिक्षित पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच पथके टपाली मतपत्रिका मोजणीसाठी व वीस पथके ईव्हीएम मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. पाच जिल्हा परिषद मतदारसंघ व त्या अंतर्गत येणारे दहा पंचायत समिती मतदारसंघ या सर्व मतदारसंघांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे.
कुसगाव बुद्रूक पंचायत समिती गणाचा निकाल सर्वात प्रथम म्हणजे आठव्या फेरीत तर काले पंचायत समिती गण व कुसगाव बुद्रूक-काले गटाचा निकाल सर्वात शेवटी म्हणजे १७ व्या फेरीअंती जाहीर होईल. मतमोजणीच्या फेऱ्यांची माहिती ध्वनीवर्धकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. केवळ अधिकृत पास असलेल्या व्यक्तींना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती नवले यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT