पिंपरी-चिंचवड

ताथवडे सेवा रस्त्यावरील व्हिजन चौकात कोंडी

CD

वाकड, ता. ८ : गेल्या काही महिन्यांपासून ताथवडे गावाच्या रस्त्याचे शेवटचे टोक व काळा खडक झोपडपट्टी जवळील कोपरा असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील व्हिजन मॉल चौक वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकला आहे. दररोज सायंकाळी आणि विकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्वांची नाकीनऊ आले आहे.
ताथवडे सेवा रस्ता तसेच त्या शेजारील गाडा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांचे अतिक्रमण, भाजीपाला व पथारी व्यावसायिकांनी थाटलेला बाजार तसेच चौकातील व्यापारी संकुले व मॉलसमोर बेकायदेशीरपणे उभे होणाऱ्या शेकडो दुचाकी-चारचाकी, रखडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम, ओला उबेर व रिक्षा चालकांचे अवैध स्थानक या सर्वांमुळे ‘रस्ता कमी, वाहतूक फार’ असे चित्र आहे. दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने घर नजरेसमोर दिसूनही घरात जायला दीड ते दोन तासांहून अधिक वेळ लागत आहे.

मोक्याच्या चौकातील काम रखडले
सुमारे दोन किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद असलेल्या येथील गाडा रस्त्याच्या रुंदीकरणाचे ऐन मोक्याच्या व्हिजन मॉल चौकात काम रखडले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याकडे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे होणारे दुर्लक्ष तेथील कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. परिसरात नव्याने झालेल्या गृहप्रकल्पांची संख्या मोठी आहे. मात्र, कामावरून ये-जा करताना सोसायटी रहिवाशांसह सर्वांचीच मोठी दमछाक होत आहे.

ताथवडेतील जाधव वस्तीपर्यंतचा गाडा रस्ता आहे. त्याच्या रुंदीकरणाचे बहुतेक काम पूर्ण झाले आहे. व्हिजन मॉल समोरील एका जागा मालकासोबत वाटाघाटीची बोलणी पूर्ण होऊ न शकल्याने येथील रुंदीकरणाचे काम रखडले आहे. जागा ताब्यात येताच काम पूर्ण केले जाईल.
- रवींद्र सूर्यवंशी, उपअभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : हजारो विद्यार्थी अपात्रतेच्या उंबरठ्यावर! पीएसआय पदासाठी वयोमर्यादा गणनेची अट; एक संधी देण्याची मागणी

PMC Election: पुण्यात भाजप कुणाला उमेदवारी देणार? निष्ठावंतं की नेत्यांच्या मर्जीतील? मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीची Inside Story

Kolhapur : आजऱ्यात मध्यरात्री अग्नितांडव, ७ चारचाकी गाड्यांसह दुकानं जळून खाक; कोट्यवधींचे नुकसान

अजितदादा गेले कुठं? दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटल्यानंतर पोलीस ताफा न घेता एकटेच निघाले

Latest Marathi News Live Update : भाजपच्या धक्क्यानंतर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये, आजपासून प्रचाराला सुरुवात; महाविकास आघाडीची घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT