वाकड, ता. ११ : येथील ‘आयआयईबीएम’ संस्थेच्या इंडस बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट आणि निवृत्त विंग कमांडर अविनाश मुथल यांनी मार्गदर्शन करताना भारतीय सैन्याच्या शौर्य आणि सामरिक तयारीची झलक दाखविली.
बापट म्हणाले, ‘भारतीय सेना ३६५ दिवस, २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज असते. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्याची तयारी यामुळे आपण कोणत्याही युद्धाला सामोरे जाण्यास समर्थ आहोत.’
मुथल म्हणाले, ‘आपण युद्धाच्या बाबतीत कधीही गाफील राहू नये. शत्रूंचे लक्ष्य आता आर्थिक राजधानी शहर आहे. त्यामुळे युद्धासाठी सतत तयार राहणे गरजेचे आहे. शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आपण स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले पाहिजे.’
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, निवृत्त कर्नल रवींद्र कुमार, संचालक प्रशासन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
WKD25A09489
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.