पिंपरी-चिंचवड

अधिकृत व्यावसायिकांना भाडे, कर; तर अनधिकृत ‘मालामाल’

CD

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा

वाकड, ता. ८ : विविध चौकाचौकांत आणि मुख्य रस्त्यांवर थाटलेल्या बेकायदा आठवडे बाजारांच्या नावाखाली अतिक्रमणांचा ‘विस्फोट’ झाला आहे. बाजारांच्या आडून अतिक्रमणांना जणू आयतेच कोलीत मिळाले आहे. बाजारांच्या आजूबाजूला अतिक्रमणांचे पेव फुटले असून ग्राहकांची वर्दळ पाहता फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनीही येथे बस्तान बसवले आहे. परिणामी, अधिकृत भाजी मंडई ओस पडल्या असून वैध व्यावसायिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रशासनाचे या प्रकाराकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून महापालिका प्रशासनाने उभारलेल्या अधिकृत भाजी मंडई ओस पडल्या असताना आठवडे बाजाराच्या आडून फोफावलेल्या बेकायदा व्यवसायांनी नियमांना हरताळ फासला आहे. त्याने अधिकृत व्यावसायिकांना देखील भुर्दंड बसत आहे. त्यांना ग्राहक मिळेनासा झाला आहे. आम्हाला भाडे, कर आणि इतर खर्च सोसावा लागतो. मात्र, हे फुकटात मालामाल होत आहेत, अशी व्यथा एका वैध भाजी विक्रेत्याने ‘सकाळ’कडे मांडली. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांची निराशा वाढत आहे.
या बाजारांभोवती केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे; तर फूड स्टॉल्स आणि फेरीवाल्यांनी देखील आपले स्टॉल उभारले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचा अतिक्रमण विभाग डोळेझाक करत आहे. वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण निर्मूलन पथक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

वाहतूक कोंडी
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, रावेत, वाकड आदी भागांत बाजार भरतात. भाजीपाला, फळे, कपडे, भांडी आदी वस्तूंच्या विक्रीसाठी येथे दुकाने थाटली जातात. मात्र, या बाजारांच्या सभोवताल अतिक्रमणांचा फैलाव इतका वाढला आहे की, रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. ग्राहकांची गर्दी पाहता आम्हीही येथे दुकान थाटले, असे एका अनधिकृत व्यावसायिकाने सांगितले.


महापालिकेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष ?
या सर्व घडामोडींमध्ये महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ‘अर्थपूर्ण’ वाटते. सूत्रांच्या माहितीनुसार, काही राजकीय दबाव किंवा आर्थिक हितसंबंधांमुळे हे अतिक्रमण कायम आहे. आम्ही नियमित कारवाई करतो, असे प्रशासनाकडून सांगितले जाते; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. महापालिकेने तातडीने बेकायदा बाजारांवर बंदी घालून अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.



महापालिका प्रशासनाने बेकायदा बाजारांवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा नागरिक, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. शहरातील स्वच्छता, शिस्त आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी प्रशासनाने केवळ नोटिसा देऊन थांबू नये; तर ठोस कारवाई करून अतिक्रमणांना आळा घालावा.
- जहीर अरब, रहिवासी, वाकड


फोटो : संतोष हांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update :दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT