वाकड, ता. ८ : बेहरीन येथील आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल थेरगावमधील गणेशनगर येथील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने चंद्रिका बोरूशी पुजारी हिचा सन्मान करण्यात आला.
प्रशिक्षक जयंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोरख गवळी, उपाध्यक्ष नितीन गवळी, सचिव भारती गवळी, खजिनदार बुद्धभूषण गवळी, सचिन शिंदे आदींसह इतर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा गवळी आणि सहशिक्षकांनी नियोजन केले. सुवर्णा तांबे यांनी सूत्रसंचालन केले.
WKD25A09792