पिंपरी-चिंचवड

वाकडला दत्तजयंतीनिमित्त पंधरा हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ

CD

वाकड, ता. ४ : श्री दत्त मंदिरात नवनाथ तरुण मंडळ व समस्त वाकड ग्रामस्थ आयोजित श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. वाकड आणि परिसरातील आयटी अभियंते आणि नागरिकांनी मिळून ३० हजाराहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता गुरुवर्य सखाराम महाराज गोपाळे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे.
दत्त जयंतीनिमित्त सायंकाळी १५ हजाराहून अधिक भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉम्प्युटर विश्वात गुंग असलेल्या हजारो आयटीयन्स अभियंत्यांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. गाभाऱ्यात श्री दत्तात्रेयांची सगुण मूर्ती, मूर्ती भोवताली फुलांनी साकारलेली दोन मयुराची आरास आकर्षक होती. मंदिर परिसर फुलांच्या तोरणांनी नटले होते. पहाटे कार्तिक स्नान, काकडा आरती झाली. सकाळी गुरू चरित्र पारायण, दुपारी सामूहिक होम हवन असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडले.
दुपारी महंत राम महाराज वणवे शास्त्री यांचे श्री दत्त जन्माचे कीर्तन झाले. अखंड हरिनाम सप्ताहात आठ दिवसांमध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांसह दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तनकारांचे दत्त चरित्र-कीर्तन झाले आहे. नवनाथ तरुण मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी व समस्त वाकड ग्रामस्थ यांनी नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: आता 'दादा' कुणाला म्हणायचं? अजित पवारांची संपूर्ण कारकिर्द... राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा

Ajit Pawar Plane Crash : विमान धावपट्टीवर आलं अन् अचानक... अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक, नरेंद्र मोदी यांची भावनिक प्रतिक्रिया

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांसह विमान प्रवास करणारे विदीप जाधव, पिंकी माळी कोण? किती जण होते विमानात?

आग, राखेचा ढिगारा, विमानाचे तुकडे, अजित पवारांच्या विमान अपघाताचे फोटो समोर

SCROLL FOR NEXT