पिंपरी-चिंचवड

मार्शल आर्टिस्ट मिको यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

CD

हिंजवडी, ता. ९ : युरोपमधील प्रख्यात मार्शल आर्टिस्ट आणि ग्रँडमास्टर मिको हायटोनन यांनी कासारसाईसारख्या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माउंट डेल स्कूलमध्ये (मुळशी) क्रीडादिनी पदक वितरण सोहळ्याला त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
क्रीडादिनी आयोजित विविध स्पर्धांत पाचशेहून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेत प्रतिभा, शिस्त आणि नैपुण्याची झलक दाखवली. या कार्यक्रमात त्यांना मिको तसेच इतर निमंत्रितांच्या हस्ते पदके देण्यात आली.
मिको यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून मार्शल आर्ट्सचा सराव सुरू केला. ‘ब्लॅक बेल्ट चॅम्पियन’ सॅनटेरी लिलियस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘ब्राझिलियन ज्यू-जित्सू’मध्ये प्रावीण्य मिळवले. त्यांच्या खडतर जीवनप्रवासाची कथा ऐकून विद्यार्थ्यांना समर्पण, एकाग्रता आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजले. मिको यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, ‘आराम करून खरे विजेते तयार होत नाहीत. शिस्त, धैर्य आणि सातत्याने केलेले प्रयत्न तुम्हाला खऱ्या अर्थाने घडवितात. तुम्ही स्वतःला कोणत्याही मर्यादा घालून घेऊ नका. प्रशिक्षणाचा आदर करा आणि मोठी स्वप्ने पाहण्यास कधीही घाबरू नका.’
मिको यांना संस्थेचे अध्यक्ष संभाजी बालवडकर यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. क्रीडादिनी आयोजित विविध स्पर्धांत पाचशेहून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेत प्रतिभा, शिस्त आणि नैपुण्याची झलक दाखवली. या कार्यक्रमात त्यांना पदके देण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, 'या' १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या भागांत कसे असेल हवामान?

Pune Airport : पुणे विमानतळावरील ‘प्रवास’ आता सुसह्य; प्रवासी आनंदले; गोंगाट अन् गर्दीही नाही

Court Action Deputy Collector : नुकसानभरपाई दिली नाही कोर्टाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक केले जप्त; कारवाईने धावाधाव अन्...

Solapur Politics: 'साेलापुरातील दाेन्ही देशमुख आमदारांची एकी'; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडले प्रश्‍न, निधी देण्याची ग्वाही..

Surya Gochar 2025: 16 डिसेंबरपासून 'या' 3 राशींचा वाढेल आदर, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

SCROLL FOR NEXT